शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी आबाल, वृद्धांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:39 IST

न्याहळोद : जलयुक्तची कामे अपूर्ण झाल्याने अत्यल्प फायदा, अक्कलपाड्याच्या आवर्तनाकडे लक्ष

विजय माळी।लोकमत न्यूज नेटवर्कन्याहळोद : यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने भीषण दुष्काळी स्थिती आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आटल्याने नळाजवळ भांडी ठेऊन ग्रामस्थांना ताटकळत उभे रहावे लागत आहेत. ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी उपाय योजना केल्या तरी पांझरेच्या आवर्तनावरच पुढील उन्हाळा अवलंबून राहणार आहे.सुमारे आठ हजार लोकसंख्या असलेल्या गावात घरोघरी नळ जोडण्या आहेत. पांझरा नदीकाठी असलेल्या गाव विहिरीतून पाण्याची टाकी भरली जाते. मात्र, येथूनच परिसरातील सात गावांच्या पाणी पुरवठा विहिरी आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी उपसा झाल्याने मूळ गावातच पाणीटंचाई निर्माण होते.टंचाईवर मात करण्यासाठी युवकांनी श्रमदानातून जुनी पाण्याची टाकी व विहीर दुरुस्ती केली. याचा फायदा झाला; परंतू पाण्याची पातळी खोल गेल्याने पुन्हा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली.जलयुक्तची कामे झाली. परंतू गावाची लोकसंख्या व शेत शिवाराचे क्षेत्रफळ पाहता अत्यंत कमी काम झाल्याचे दिसून येत आहे. कामे सर्वत्र झाली तरच जलयुक्त शिवार कामांचा उपयोग होईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरुन पाटबंधारे विभागातर्फे बुधवारी अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी गावाजवळ पोहचल्या नंतर काही दिवसांनी विहिरींची जल पातळी वाढणार आहे. त्यामुळे सर्वांचे या पाण्याच्या आवर्तनाकडे लक्ष लागून आहे. पाणी जूनपर्यंत हवे, अशी भूमिका प्रशासनाने घेतल्याने तब्बल आठ महिने नदी पात्र कोरडे आहे. त्यामुळे गावात प्रथमच पाण्याचे टँकर, बोअरींग करणे, खाजगी शेतकºयाच्या विहिरीचे पाणी घेणे अशा पर्यायी उपाययोजना कराव्या लागल्या. पाणी भरण्यावरून अनेकवेळा वाद देखील झाले. आता आवर्तनाचे पाणी कधी पोहचते, त्यावरच पाणीटंचाई दूर होणे अवलंबून राहणार आहे.पाणी पुरवठा विहिरीतील गळ काढणे, आडवे बोअर करणे यासह जुनी पाणी वितरण व्यवस्थेची गळती बंद केली. शासकीय मदत अजून घेतली नाही.-ज्योती भिल, सरपंच न्याहळोद

टॅग्स :Dhuleधुळे