शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांना खुणावतो नवादेवी धबधबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 12:09 IST

महाराष्टÑातील पर्यटन स्थळात महाबळेश्वर, पाचगणी ही स्थळे आघाडीवर आहेत़ असे असले तरी खान्देशातील शिरपूर परिसर निसर्ग सौंदर्याच्याबाबतीत ‘महाबळेश्वर’ सारखेच ...

महाराष्टÑातील पर्यटन स्थळात महाबळेश्वर, पाचगणी ही स्थळे आघाडीवर आहेत़ असे असले तरी खान्देशातील शिरपूर परिसर निसर्ग सौंदर्याच्याबाबतीत ‘महाबळेश्वर’ सारखेच आहे़ पर्यटनाच्या दृष्टिकोनातून शिरपूर परिसरात अनेक निसर्ग सौंदर्याने नटलेली स्थळे आहेत़ असे असले तरी पर्यटन विभागाने अशी स्थळे पर्यटनस्थळे घोषित करून त्यांना निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे़ अशा स्थळांना पर्यटनस्थळे घोषित करावी, अशी मागणी कोडीद ग्रामस्थांनी केली आहे़कोकण किंवा तोरणमाळसारख्या ठिकाणी असणारे निसर्गरम्य वातावरण व हिरवळीने शालू पांघरलेल्या डोंगरांमध्ये, खळखळून वाहणारा पांढराशुभ्र कोडीद गावाजवळील नवादेवी येथील धबधबा पर्यटकांना खुणावतोय़शिरपूरपासून साधारण ३३ किमी अंतरावर कोडीद गाव असून तेथून ४ किमी अंतरावर अनेक वळण घेत, दुर्गम भागात नवादेवी नावाचा छोटा आदिवासी पाडा आहे. येथे नवादेवीचे अतिशय सुरेख मंदिर आहे. नवादेवी मंदिरात देवीची मुर्ती आहे. मंदीरावर नाग, त्रिशुलच्या प्रतिकृती काढल्या आहेत. पूर्वीपासून येथे आदिवासी बांधव नवस फेडण्यासाठी व दर्शनासाठी येत असतात. या मंदिराजवळच धबधबा आहे. या धबधब्याची उंची सरासरी ४० फुट आहे़ आजूबाजूला उंच डोंगर आहेत. जंगलातून वेगाने पाणी येते व खळखळून खाली येताना पांढरेशुभ्र दुधासारखे फेस उडवत खाली येते. त्यामुळे येथील दृश्य अतिशय रमणीय आहे. पाण्याचा तीरकस उतार असल्यामुळे पर्यटकांना चांगला आनंद घेता येतो. कोडीद येथे पुरातन महादेव मंदीर व किल्ल्याचे अवशेष आहेत.कोडीद येथून ३ कि.मी. अंतरावर असलेले नवादेवी धबधब्याला अल्पावधीतच प्रसिद्धी मिळाली असून याठिकाणी पर्यटकांची गर्दी करतांना दिसत आहे़ याठिकाणी जाण्यासाठी नागमोडी रस्ता आहे़ मात्र, धबधबा ठिकाणी कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत़ या ठिकाणाला पर्यटन मंत्रालय व प्रशासनाकडून पर्यटन स्थळ घोषित करावे. त्यामुळे निधी उपलब्ध होऊन बऱ्याच सुधारणा होऊ शकतात. याठिकाणी येणाºया पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे़ त्यामुळे डोंगर पायथ्याशी जाणाºया पर्यटकांना बºयाच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महिला, बालके, वृद्धसुद्धा खूप मोठया प्रमाणात येत असतात़ त्यांना धबधबा ठिकाणी ये-जा करण्यासाठी होणारा त्रास लक्षात घेता पायऱ्यांची सोय करणे, रस्त्याची बांधणी, मंदिर पुर्नबांधणी तसेच मंदिराकडे जाणाºया रस्त्याला तयार करणे आदी कामे करून परिसर सुशोभित करणे नितांत गरज आहे. धबधबाकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे अनेकदा पाय घसरून पडण्याचे प्रमाण वाढले आहे, आबाल-वृद्धांना चढणे उतरण्यास होणारा त्रास या घटना सध्या दिवसेंदिवस घडतांना दिसत आहे़तसेच कोडीद परिसरातील नवादेवी व्यतिरिक्त समरादेवी, बाबाकुवर हे स्थळ नवादेवीपेक्षाही अधिक आकर्षक व प्रसिद्ध आहे़ तसेच या परिसरात दहापेक्षा अधिक लहान-मोठे धबधबे असणाºया समारादेवी स्थळाला पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्धीस आणायचे असल्यास त्याठिकाणी रस्ता असणे आवश्यक आहे. रस्त्याची मागणी व स्थळ सुधारणेसाठी स्थानिक नागरिक व कोडिद ग्रामपंचायत कायम प्रयत्नशील आहे, पण कामाची अजुन प्रतिक्षाच आहे. सातपुडयाच्या कुशीतील स्थळांना पर्यटनाचा दर्जा मिळाल्यास स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे़बोराडी गावाजवळ ब्रिटिशकालीन तोफ व बंगला आहे. धाबादेवी येथे साधारण सातव्या शतकातील पुरातन मंदिर आहे. येथे देवदेवतांच्या मुर्ती व दोन धबधबे आहेत. म्हणजे पर्यटकांना एका दिवसात या सर्व पर्यटन स्थळांना भेट देता येईल. या सर्व स्थळांचा विकास झाला तर लोकांचे पर्यटन होईल व या भागात लोकांना रोजगार मिळून विकासासाठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे़शिरपूरचे ‘महाबळेश्वर’ म्हणून ओळखले जाणारे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले नागेश्वर बंगला येथील परिसर निसर्ग सौंदर्याने खुलून गेला आहे़ हिरवीगार गर्द झाडी, हिरवा शालू पांघरलेले गर्भगिरीचे डोंगर, पर्यटन विकास केंद्र, सातपुडाचा डोंगर, नागेश्वर मंदिर या सर्वांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक कुटुंबियासोबत वन डे पिकनिक म्हणून या परिसरात गर्दी करीत आहेत़ शिरपूर शहरात विविध स्थळे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत़

पर्यटकांना खुणावतो नवादेवी धबधबाधुळे: महाराष्टÑातील पर्यटन स्थळात महाबळेश्वर, पाचगणी ही स्थळे आघाडीवर आहेत़ असे असले तरी खान्देशातील शिरपूर परिसर निसर्ग सौंदर्याच्याबाबतीत ‘महाबळेश्वर’ सारखेच आहे़ पर्यटनाच्या दृष्टिकोनातून शिरपूर परिसरात अनेक निसर्ग सौंदर्याने नटलेली स्थळे आहेत़ असे असले तरी पर्यटन विभागाने अशी स्थळे पर्यटनस्थळे घोषित करून त्यांना निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे़ अशा स्थळांना पर्यटनस्थळे घोषित करावी, अशी मागणी कोडीद ग्रामस्थांनी केली आहे़कोकण किंवा तोरणमाळसारख्या ठिकाणी असणारे निसर्गरम्य वातावरण व हिरवळीने शालू पांघरलेल्या डोंगरांमध्ये, खळखळून वाहणारा पांढराशुभ्र कोडीद गावाजवळील नवादेवी येथील धबधबा पर्यटकांना खुणावतोय़शिरपूरपासून साधारण ३३ किमी अंतरावर कोडीद गाव असून तेथून ४ किमी अंतरावर अनेक वळण घेत, दुर्गम भागात नवादेवी नावाचा छोटा आदिवासी पाडा आहे. येथे नवादेवीचे अतिशय सुरेख मंदिर आहे. नवादेवी मंदिरात देवीची मुर्ती आहे. मंदीरावर नाग, त्रिशुलच्या प्रतिकृती काढल्या आहेत. पूर्वीपासून येथे आदिवासी बांधव नवस फेडण्यासाठी व दर्शनासाठी येत असतात. या मंदिराजवळच धबधबा आहे. या धबधब्याची उंची सरासरी ४० फुट आहे़ आजूबाजूला उंच डोंगर आहेत. जंगलातून वेगाने पाणी येते व खळखळून खाली येताना पांढरेशुभ्र दुधासारखे फेस उडवत खाली येते. त्यामुळे येथील दृश्य अतिशय रमणीय आहे. पाण्याचा तीरकस उतार असल्यामुळे पर्यटकांना चांगला आनंद घेता येतो. कोडीद येथे पुरातन महादेव मंदीर व किल्ल्याचे अवशेष आहेत.कोडीद येथून ३ कि.मी. अंतरावर असलेले नवादेवी धबधब्याला अल्पावधीतच प्रसिद्धी मिळाली असून याठिकाणी पर्यटकांची गर्दी करतांना दिसत आहे़ याठिकाणी जाण्यासाठी नागमोडी रस्ता आहे़ मात्र, धबधबा ठिकाणी कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत़ या ठिकाणाला पर्यटन मंत्रालय व प्रशासनाकडून पर्यटन स्थळ घोषित करावे. त्यामुळे निधी उपलब्ध होऊन बऱ्याच सुधारणा होऊ शकतात. याठिकाणी येणाºया पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे़ त्यामुळे डोंगर पायथ्याशी जाणाºया पर्यटकांना बºयाच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महिला, बालके, वृद्धसुद्धा खूप मोठया प्रमाणात येत असतात़ त्यांना धबधबा ठिकाणी ये-जा करण्यासाठी होणारा त्रास लक्षात घेता पायऱ्यांची सोय करणे, रस्त्याची बांधणी, मंदिर पुर्नबांधणी तसेच मंदिराकडे जाणाºया रस्त्याला तयार करणे आदी कामे करून परिसर सुशोभित करणे नितांत गरज आहे. धबधबाकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे अनेकदा पाय घसरून पडण्याचे प्रमाण वाढले आहे, आबाल-वृद्धांना चढणे उतरण्यास होणारा त्रास या घटना सध्या दिवसेंदिवस घडतांना दिसत आहे़तसेच कोडीद परिसरातील नवादेवी व्यतिरिक्त समरादेवी, बाबाकुवर हे स्थळ नवादेवीपेक्षाही अधिक आकर्षक व प्रसिद्ध आहे़ तसेच या परिसरात दहापेक्षा अधिक लहान-मोठे धबधबे असणाºया समारादेवी स्थळाला पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्धीस आणायचे असल्यास त्याठिकाणी रस्ता असणे आवश्यक आहे. रस्त्याची मागणी व स्थळ सुधारणेसाठी स्थानिक नागरिक व कोडिद ग्रामपंचायत कायम प्रयत्नशील आहे, पण कामाची अजुन प्रतिक्षाच आहे. सातपुडयाच्या कुशीतील स्थळांना पर्यटनाचा दर्जा मिळाल्यास स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे़बोराडी गावाजवळ ब्रिटिशकालीन तोफ व बंगला आहे. धाबादेवी येथे साधारण सातव्या शतकातील पुरातन मंदिर आहे. येथे देवदेवतांच्या मुर्ती व दोन धबधबे आहेत. म्हणजे पर्यटकांना एका दिवसात या सर्व पर्यटन स्थळांना भेट देता येईल. या सर्व स्थळांचा विकास झाला तर लोकांचे पर्यटन होईल व या भागात लोकांना रोजगार मिळून विकासासाठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे़शिरपूरचे ‘महाबळेश्वर’ म्हणून ओळखले जाणारे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले नागेश्वर बंगला येथील परिसर निसर्ग सौंदर्याने खुलून गेला आहे़ हिरवीगार गर्द झाडी, हिरवा शालू पांघरलेले गर्भगिरीचे डोंगर, पर्यटन विकास केंद्र, सातपुडाचा डोंगर, नागेश्वर मंदिर या सर्वांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक कुटुंबियासोबत वन डे पिकनिक म्हणून या परिसरात गर्दी करीत आहेत़ शिरपूर शहरात विविध स्थळे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे