लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्यातील कनोली मध्यम प्रकल्पाच्या पाटचारी क्रमांक एकचे पाणी शुक्रवारी सकाळी बंद करुन पाटचारी क्रमांक तीनमधून विंचूर, तरवाडे, नाणे, सिताणे येथील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी सोडले जाणार आहे़पाटचारी क्रमांक एकचे पाणी बंद केले तर पाटचारीवरुच आत्मदहन करण्याचा ईशारा बोरकुंड आणि नंदाळे येथील शेतकºयांनी दिला होता़ त्यामुळे पाटबंधारे विभागाने जिल्हा पोलिस अधीक्षक यांना पत्र देवून पोलिस बंदोबस्ताची मागणी केली़ त्यानुसार पोलिसांनी दोन कर्मचारी बंदोबस्तासाठी उपलब्ध करुन दिले आहेत़ सकाळी आठला पाटबंधारे विभागाचे अधिकारी पाटचारी एकचे पाणी बंद करतील आणि दहा वाजता पाटचारी क्रमांक तीनमधून पाणी सोडतील, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली़ यादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी आवश्यक पोलिस बंदोबस्त दिला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी लोकमतला दिली़ सध्या दहावीच्या परीक्षांमध्ये बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारी तैनात असल्याने दोन कर्मचाºयांचा बंदोबस्त मिळाला आहे़दरम्यान, प्रत्येक शेतकºयाच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्याचे नियोजन आहे़ त्यामुळे शेतकºयांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विश्वास दराडे यांनी केले आहे़ तसेच शेतकºयांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करणारी दवंडी पिटण्याच्या सूचना ग्रामसेवक आणि पोलिस पाटील यांना प्रशासनाने दिल्या आहेत़कनोली मध्यम प्रकल्प ४६ वर्षांपूर्वी बांधलेला असून त्याला एक उजवा कालवा आहे़ त्याची लांबी १४ किलोमीटर असून त्यावर ४ वितरीका आहेत़ वितरीका क्रमांक एक आणि दोन या चार ते सहा किलोमीटरमध्ये येतात़ वितरीका क्रमांक तीन १२ व्या किलोमीटरला तर चार नंबरची वितरीका थेट १४ किलोमीटर अंतरावर आहे़ प्रत्येक वितरिकेची लांबी सरासरी चार किलोमीटर आहे़ यावर्षी रब्बी हंमागात प्रकल्प शंभर टक्के भरला़ परंतु जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सदर प्रकल्पाच्या कालव्याच्या दुरूस्तीसाठी निविदा प्रक्रिया रखडल्यामुळे देखभाल दुरूस्तीच्या कामाला उशिर झाला़ पावसाळा लांबल्यामुळे शेतकºयांनी जानेवारी महिन्यात पाण्याची मागणी केली़ शासनाच्या पाटबंधारे विभागाचा १९७६ च्या कायद्यानुसार कालव्याच्या शेवटच्या भागापासून ते पहिल्या भागापर्यंत पाणी देणे बंधनकारक आहे़ त्यानुसार वितरीका क्रमांक चारला पाण्याचे पहिले आवर्तन सुरू करुन त्याचा भरणा एक मार्च रोजी केला़ त्यानंतर वितरीका तीनमधून पाणी देणे सुरू केले होते़ दोन मार्च रोजी वितरीका एक आणि दोनच्या शेतकºयांनी परस्पर दरवाजे उघडून पाणी सुरू करुन घेतले, असा आरोप पाटबंधारे विभागाने केला आहे़ या वितरीका बंद करण्यास गेलेल्या कर्मचाºयांना दमदाटी करुन जीवे ठार माण्याची धमकी देवून हुसकावून लावले़ त्यामुळे वितरीका तीनचे पाणी बंद झाले़मुळात कनोली कालव्याची प्रकल्पीय वहन क्षमता तीस क्युसेक्स एवढी आहे़ परंतु सद्यस्थितीत सदर कालवा २५ क्युसेक्स एवढ्यचा क्षमतेने चालु आहे़ त्यामुळे वितरीका क्रमांक एक बंद केल्याशिवाय वितरीका तीनमधून पाणी देणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही़ अशा परिस्थितीत वितरीका तीनवरील विंचूर, तरवाडे, नाणे, सिताणे येथील शेतकºयांनी कार्यालयात आंदोलन करुन दोन दिवसात पाणी सोडले नाही तर आत्मदहन करु असा ईशारा दिला़ त्यांना सहा मार्चपर्यंत पाणी देण्याचे आश्वासन दिल्यावर त्यांनी आंदोलन मागे घेतले़ वितरीका एक आणि दोनच्या शेतकºयांना पाणी मिळाले असल्याने सहा तारखेला त्यांचे पाणी बंद केले जाईल़ दरम्यान, पाणी बंद केले तर वितरीका एकवरील नंदाळे आणि बोरकुंडचे शेतकरी आत्मदहन करीतील असा संदेश पाटबंधारे विभागातील एका अभियंत्याच्या व्हॉटस्अपवर प्राप्त झाला आहे़पाणी सोडावे या मागणीसाठी शेतकºयांनी मंगळवारी सिंचन भवनात इंधन आणून तसेच छताला दोर बांधून आत्महत्या करण्याचा इशारा दिला़ त्यामुळे वितरिका तीनमधून सहा तारखेला पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे़वितरिका क्रमांक एकचे पाणी बंद केल्याशिवाय वितरिका तीनमधून पाणी सोडणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याने वितरिका एकचे पाणी बंद केले जाणार आहे़ परंतु वितरिका एकचे पाणी बंद केले तर आम्ही आत्मदहन करु असा इशारा येथील शेतकºयांनी दिला आहे़शेतकºयांच्या या भूमिकेमुळे पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांची गोची झाली आहे़त्यामुळे पोलिस बंदोबस्तात पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी घेतला असून यासंदर्भात गुरूवारी जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्र देवून बंदोबस्ताची मागणी केली जाणार आहे़ दरम्यान, शुक्रवारी पाटचारी एकचे पाणी बंद करताना वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही़
पाटचारी तीनमधून आज सोडणार पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 13:02 IST