शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे मनपातर्फे उपविधी मंजूर नसतांना पाणीपट्टी आकारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 17:38 IST

नळजोडणी नसलेल्या मालमत्तांना ठरावानुसार ५०० रूपये आकारणीवर लेखापरीक्षणात आक्षेप

ठळक मुद्देनळजोडणी नसलेल्या मालमत्ताधारकांना सरसकट ५०० रूपये पाणीपट्टी आकारली जाते़महासभेत २२ एप्रिल २०१० ला त्याबाबतचा ठराव़उपविधी मंजूर नसतांना पाणीपट्टी आकारणीवर लेखापरीक्षणात आक्षेप़

धुळे : शहरात मनपाच्या दफ्तरी असलेल्या नोंदीनुसार सुमारे ७० हजार मालमत्ताधारक आहेत़ तर ३८ हजार नळधारक आहेत़ मात्र ज्या मालमत्ता धारकांकडे नळकनेक्शन नाही, त्यांना मनपाकडून ५०० रूपये पाणीपट्टी आकारणी केली जाते़ परंतु उपविधी मंजूर नसतांना होत असलेल्या या आकारणीवर लेखापरीक्षणात आक्षेप नोंदविण्यात आला आहे़ शहरात पिण्याच्या पाण्याचा आणि नियोजनाचा प्रश्न जटील आहे. जीर्ण जलवाहिन्यांना सतत गळती लागत असल्याने देखभालदुरूस्तीचा खर्च वाढत आहे़ दरम्यान, शहरात सद्यस्थितीत ७० हजार मालमत्ताधारक असले तरी त्या तुलनेत अधिकृत नळ कनेक्शन्सची संख्या केवळ ३८ हजार इतकी आहे़ मात्र ज्यांच्याकडे नळ कनेक्शन नाही ते देखील मनपा हद्दीत राहत असून मनपाचेच पाणी वापरतात़ त्यामुळे अशा मालमत्तांना सरसकट ५०० रूपये पाणीपट्टी आकारण्याचा ठराव मनपाच्या २२ एप्रिल २०१० च्या महासभेत करण्यात आला होता़  सदर ठरावाची अंमलबजावणी देखील होत आहे़ मात्र महापालिका प्रांतिक अधिनियम १९४९ नुसार महापालिका आर्थिक उत्पन्नाचे व्यवस्थापन करण्यासाठी ऐच्छिक कर आकारू शकते मात्र असे कर आकारतांना करप्रकार व दर यांचा उपविधी करून शासनाकडून मंजूरी प्राप्त करणे आवश्यक आहे़ शासनाची मंजूरी मिळाल्यानंतरच कर रक्कम वसुल करता येईल, असे नियमात म्हटले आहे़ तथापि धुळे महापालिकेने उपरोक्त नियम व स्थायी निदेशानुसार उपविधी मंजूर करून न घेता नळजोडणी नसलेल्या मालमत्ताधारकांकडून ५०० रूपये पाणीपट्टीची आकारणी करून अनियमितता केल्याचा ठपका नुकत्याच झालेल्या मनपाच्या २०१२-१३ च्या लेखापरीक्षण अहवालात ठेवण्यात आला आहे़ अजूनही ५०० रूपये आकारणी होत आहे़