शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

शिंदखेडा तालुक्यातील सोनशेलू, दत्ताणे-मेलाणे गावाला टॅँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 18:48 IST

धुळे जिल्हा : नऊ गावांना टॅँकरने पाणी

ठळक मुद्दे गेल्या आठवड्यात साक्री तालुक्यातील अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले होते. हे पाणी सोडल्यामुळे धुळे, शिंदखेडा व जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पांझरा नदीच्या काठी असलेल्या शंभरपेक्षा अधिक गावांना फायदा झाला.हे पाणी सोडल्यामुळे नदीलगताच्या गावातील विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून हे पाणी शिंदखेडा तालुक्यातील मुडावदपर्यंत पोचहले आहे.अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पाणी सोडल्यामुळे पांझरानदीकाठावरील गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

धुळे :  जिल्हा प्रशासनाने शिंदखेडा तालुक्यातील सोनशेलू व दत्ताणे-मेलाणे या गावातील भीषण पाणी टंचाई विचारात घेता या गावांना टॅँकरने पाणीपुरवठा सुरू केला असून जिल्ह्यात सद्य:स्थितीत नऊ गावांना टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. टॅँकरने पाणी पुरवठा सुरू असणाºया गावांपैकी शिंदखेडा तालुक्यातील आठ गावे असून एक गाव धुळे तालुक्यातील आहे. यंदा जिल्ह्यात धुळे व शिंदखेडा तालुक्यातील अनेक गावात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. परिणामी, या दोन्ही तालुक्यातील बहुसंख्य गावांची आणेवारी ही ५० पैशाच्या आत आहे. परिणामी, या दोन्ही तालुक्यातील काही गावांना पाणी टंचाईची झळ बसली आहे. जानेवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात आठ गावांना टॅँकरने पाणी पुरवठा सुरू होता. त्यानंतर शिंदखेडा तालुक्यातील सोनशेलू व दत्ताणे-मेलाणे गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली. त्यामुळे या दोन्ही गावांमध्ये प्रशासनातर्फे टॅँकरने पाणी दिले जात आहे. दरम्यान, शिंदखेडा तालुक्यातील वारूड गावात सद्य:स्थितीत पाण्याची परिस्थिती बरी असल्याने जानेवारीच्या अखेरीस वारूड गावात सोडण्यात येणारे पाण्याचे टॅँकर बंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

सद्य:स्थितीत या गावांना टॅँकरने पाणी पुरवठा शिंदखेडा तालुका :  पथारे, भडणे, वरूळ, चुडाणे, वाघाडी, विटाई, सोनशेलू, दत्ताणे-मेलाणे, धुळे तालुका : आंबोडे