शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात राष्टÑवादी कॉँग्रेसतर्फे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या प्रतिमेला शेण, चपलांचा मारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 16:29 IST

महिलांच्या अवमानप्रकरणी महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी

ठळक मुद्देमंत्री महाजन यांच्या वक्तव्याचा महिला राष्टÑवादी काँग्रेसतर्फे निषेधसरकारविरूद्ध केली घोषणाबाजीअनेक महिलांनी व्यक्त केल्या संतप्त भावना

आॅनलाईन लोकमतधुळे : दारूच्या ब्रॅँडला महिलांचे नाव दिले तर जास्त खप होईल, असे वक्तव्य करून महिलांचा अवमान करणारे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचा येथे राष्टÑवादी महिला कॉँग्रेसने तीव्र शब्दांत निषेध केला. सोमवारी दुपारी शहरातील महाराणा प्रताप चौकात मंत्री महाजन यांच्या  प्रतिमेला शेण आणि चपलांचा मार देत आपला रोषही व्यक्त केला. तसेच त्यांच्या  राजीनाम्याची मागणी करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात बोलताना मंत्री महाजन यांनी वरील वक्तव्य केले होते. कारखान्यांनी उत्पादित केलेल्या दारूच्या ब्रॅँडला महिलांचे नाव दिल्यास त्याचा जास्त खप होईल, असा उघड सल्ला त्यांनी यावेळी जाहीर भाषणातून दिला. महिलांविषयी असे बेताल वक्तव्य करून त्यांनी तमाम महिलावर्गाचा अवमान केला आहे. आपणही एका मातेच्या पोटी जन्माला आलेलो आहोत, याचे भानही ते यावेळी विसरले. सत्तेच्या धुंदीत भाजपच्या नेत्यांची जीभ वारंवार घसरत असून मंत्री महाजन हे त्या पैकीच एक वाचाळवीर असल्याचा आरोप राष्टÑवादीच्या महिला पदाधिकाºयांनी केला.  राष्टÑवादी महिला कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष ज्योती पावरा यांच्या नेतृत्वात महिलांनी त्यांच्या प्रतिमेला शेण व चपलांचा मारा देत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती इंदू वाघ, युवती जिल्हाध्यक्षा मीनल पाटील, धुळे तालुकाध्यक्षा सुमित्रा चौधरी, शिंदखेडा तालुकाध्यक्षा प्रियंका पाटील  यांच्यासह राधिका ठाकूर, आरती पवार, कल्पना गवळी, मालती पाडवी, शफीन बक्श, फातिमा अन्सारी, वंदना पाटील, सुवर्णा बेहरे, निरू शर्मा आदी उपस्थित होत्या. यावेळी महिलांनी मंत्री महाजन व भाजपा सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून बेताल वक्तव्य करणाºया महाजन यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली.