शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

एक वर्षाच्या आत रोज एक तास पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:18 IST

अनिल गोटे : जाहीर प्रचार सभेत दिले आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  : महापालिका निवडणुकीद्वारे हेमा गोटे महापौर झाल्यास एक वर्षाच्या आत शहरातील ६ लाख जनतेला रोज सकाळी एक तास पाणी देण्याचे वचनरूपी आश्वासन आमदार अनिल गोटे यांनी दिले. लोकसंग्राम पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवतीर्थावर गुरूवारी रात्री झालेल्या जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते. तसे न झाल्यास मी आमदारकीसाठी मते मागायला येणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.   व्यासपीठावर माजी नगराध्यक्षा हेमा गोटे, तेजस गोटे, दिलीप साळुंखे, योगेश मुकुंदे आदी उपस्थित होते. सरकारने  शहरातील अतिक्रमितांची यादी मागविली होती. परंतु मनपातील सध्याच्या सत्ताधाºयांनी ती अद्याप दिली नाही. पण आाची सत्ता येताच पहिल्या १०० दिवसात शहरातील साडेअठरा हजार झोपडपट्टी वासीयांना त्यांच्या हक्काचा सातबारा उतारा द्या, असा ठराव मनपात करून सरकारकडे नेण्याचे आश्वासनही आमदार गोटे यांनी दिले. ही संधी न साधता तुम्ही भाजपच्या गुंड उमेदवारांना निवडून दिल्यास तुमच्या माता-भगिनी, मुली सुरक्षितपणे शहरात फिरू शकणार नाही, असा गंभीर इशारा दिला.  भाजपच्या तिन्ही मंत्र्यांसह पदाधिकाºयांवरही चौफेर टीका केली. डॉ.भामरे म्हणतात मी २५ हजार कोटी रुपये आणले. मग ते कुठे गेले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग होणार ही खोटी गोष्ट असून हे मी नीट अभ्यास करून बोलतो. रेल्वेने मला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, अजून या मार्गाचा डीपीआरच झालेला नाही असेही ते म्हणाले़ 

टॅग्स :Dhuleधुळे