लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : यंदा खरीप हंगामाच्या अखेरच्या काळात समाधानकारक पावसाळा झाल्याने गावातील भात नदीवरील सबस्टेशन जवळील तलाव वजा कोल्हापुरी बंधाऱ्यात ८० टक्के जलसाठा आहे. मात्र तलावाजवळील ग्र.प.च्या विहीरीचे खोलीकरण नसल्यामुळे पाणीपुरवठयासाठी विहीरीत पाणीसाठा जास्त होत नाही. त्यामुळे गावात पाणीटंचाई आहे. ती दूर करण्यासाठी विहीरीचे खोलीकरण करावे, अशी मागणी होत आहे.येथील केटीवेअर बंधाºयात धरणात समाधानकारकपणे पाण्याचा साठा आहे जिल्हा परिषदेने पाणीपुरवठ्याचे विहिरींना खोलीकरण करण्याची परवानगी दिली तर सदर विहिरींचे खोलीकरण करून गावाचा पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सरपंच जया प्रमोद पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.तर गटनेते भगवान पाटील यांनी सांगितले की, गेल्यावर्षी देवभाने धरणाच्या पायथ्याशी असलेली गावाच्या पाणीपुरवठ्या विहीर खोल करण्यात आली होती. यंदा केटीवेअर जवळील विहीरीचे खोलीकरण करु.
धरणात पाणी मात्र गावात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 21:06 IST