शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन पाटचारीत ‘पाणी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबेटावद : जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे असलेल्या ब्रिटिशकालीन पाटचारीची तरुणांनी दुरुस्ती केली़ परिणामी या पाटचारीत पांझरेचे पाणी आल्याने त्याचा परिणाम जलसंवर्धनात होणार आहे़ बेटावद गावातील तरुणांच्या श्रमदानामुळे हे शक्य झाले असल्याचे चित्र समोर आलेले आहे़ त्यांचे हे कार्य आदर्श मानले जात आहे़ शिंदखेडा तालुक्यातील बेटावदला असलेली पांझरा नदी ...

ठळक मुद्देबेटावदच्या तरुणांनी ठेवला सर्वांसमोर आदर्शजलसंवर्धनासाठी केले श्रमदान पांझरेच्या पाण्याने तुडुंब भरली पाटचारी

लोकमत न्यूज नेटवर्कबेटावद : जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे असलेल्या ब्रिटिशकालीन पाटचारीची तरुणांनी दुरुस्ती केली़ परिणामी या पाटचारीत पांझरेचे पाणी आल्याने त्याचा परिणाम जलसंवर्धनात होणार आहे़ बेटावद गावातील तरुणांच्या श्रमदानामुळे हे शक्य झाले असल्याचे चित्र समोर आलेले आहे़ त्यांचे हे कार्य आदर्श मानले जात आहे़ शिंदखेडा तालुक्यातील बेटावदला असलेली पांझरा नदी जलसंजीवनी असल्यामुळे काठावरील गावांना पांझरा नदीच्या पाण्याचा लाभ चांगल्यापैकी मिळतो आहे़ परंतु बेटावदला तो एका वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने मिळण्यासाठी ब्रिटिशांनी करून ठेवलेली ‘कल्पकता’ आजही उपयुक्त ठरत आहे़ बेटावद मंडळातील अजंदे बुद्रूक येथील के़ टी़ वेअरच्या बाजूला ब्रिटिशांनी एक पॉर्इंट दिलेला होता़ तेथून त्या पॉर्इंटवरून पांझरा नदीचे पाणी त्या ठिकाणी आल्यावर तेथून एक पाटचारी ब्रिटिशांनी तयार करून दिलेली होती़ त्यात ते पाणी टाकून त्याचा लाभ बेटावदसह पडावद, पाष्टेच्या शिवारापर्यंत शेतीस मिळण्यास मदत होत आहे़ या ब्रिटिशकालीन पाटचारीचा आधार घेऊन तिच्या काठावर असलेल्या विहिरींच्या जलपुनर्भरणाचा प्रयोगही झालेला आहे़ यामुळे बेटावद येथील ब्रिटिशकालीन पाटचारीला ऐतिहासिक महत्त्वसुद्धा आहे़ असे असताना दरवर्षी पावसाळ्याच्या अगोदर दुरुस्ती होणे आवश्यक असते़ गेल्या वर्षभरापूर्वी या पाटचारीमध्ये निर्माण झालेल्या असंख्य अडथळ्यांमुळे या पाटचारीमध्ये पाणी पूर्ण क्षमतेने वाहत नव्हते़ त्यासाठी येथील दिनेश नारायण माळी, आऱयू़ पाटील, योगेश बाविस्कर, प्रमोद माळी, मेघराज माळी, महेंद्र कैलास माळी, रवींद्र फुले, वसीम बागवान या तरुणांनी स्वखर्चाने आणि श्रमदान करून या ब्रिटिशकालीन पाटचारीमधील संपूर्ण अडथळे दूर केले़ या पाटचारीची साफसफाई केली़ त्यामुळे ही पाटचारी त्यांनी केलेल्या श्रमदानामुळे तुडुंब भरून वाहत आहे़ सध्या हा लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे़