शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर शहरात अद्याप पाणी साचून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 13:13 IST

जिल्ह्यात 61 मि.मी. पाऊस : 24 तासात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

ठळक मुद्दे नदी-नाले वाहू लागले होत़े विक्रेत्यांची चांगलीत तारंबळ

ऑनलाईन लोकमत

धुळे, दि. 30 -  सलग दुस:या दिवशी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. परंतु हंगामासाठी पाऊस उपयुक्त ठरणार असल्याने शेतक:यांना दिलासा मिळाला आहे. सोमवारच्या अतिवृष्टीमुळे शिरपूर शहरातील विस्कळीत जनजीवन आता पूर्वपदावर येत असले तरी सखल भागात साचलेले पाणी अद्याप कायम आहे. जिल्ह्यात बुधवारी सकाळी 8 वाजेर्पयत संपलेल्या 24 तासांत 61 मि.मी. पाऊस झाला. सोमवारी सायंकाळी शिरपूर शहर परिसरात एकाच दिवशी तब्बल 93 मिमी अर्थातच अतिवृष्टी झाल्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तहसील कार्यालयाचा परिसरही पाण्यात गेला. धुळे शहरातही मंगळवारी दमदार पाऊस झाला. दरम्यान, 24 तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला असून आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिरपूरला सर्वाधिक पाऊस बुधवारी 8 वाजेर्पयत शिरपूर तालुक्यात सर्वाधिक 24 मि.मी. पाऊस झाला. शिंदखेडा तालुक्यात 21 तर धुळे व साक्री तालुक्यात प्रत्येकी 8 मि.मी. असा एकूण 61 मि.मी. पाऊस नोंदण्यात आला. नागरिकांचे हाल सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शिरपूर शहरातील विविध भागात मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे मंगळवारी नागरिकांना नाहक त्रास सहन करत कार्यालयात यावे लागले. शहरासह तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आह़े 20 ऑगस्ट रोजी 18 मिमि, 21 ला 77, 22 ला 11, 23 ला 20, 25 ला 26 तर 29 रोजी 93 मिमि पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आह़े बुधवारी शहरातील सखल भागात साचलेले पाणी कायम होते. 91.33 टक्के पाऊस शिरपूर तालुक्यात  मंडळानिहाय काल झालेला पाऊस व कंसात आतार्पयत पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे- शिरपूर मंडळात 93 (590), थाळनेर 10 (359), होळनांथे 5 (343), अर्थे 22 (395), जवखेडा 20 (383), बोराडी 55 (822), सांगवी 43 (476) म्हणजेच या तालुक्यात आतार्पयत 91़33 टक्के सरासरी इतका पाऊस झाला़ सोमवारी झालेल्या पावसामुळे प्रथमच अरूणावती नदी वाहती झाली आह़े मध्यप्रदेश व महाराष्ट्र सरहद्दीवर जोरदार पाऊस झाल्यामुळे प्रथमत: त्या भागातील नदी-नाले वाहू लागले होत़ेशहरातही जोरदार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले होत़े तहसिल कार्यालयासमोर पावसाचे पाणी साचल़े कार्यालयासमोरील रस्ता वरती व कार्यालय देखील वरती असल्यामुळे आणि त्या दोघांमधील रस्ता खोलगट असल्यामुळे तेथे मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले होत़ेधुळे शहरात मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजता दमदार पावसाचे आगमन झाले. अर्धा तास दमदार सरी बरसल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर पुन्हा सायंकाळी पाच वाजता पाऊस पडण्यास सुरुवात झाली. तब्बल एक तास पाऊस सुरू असल्यामुळे आग्रारोड, पाचकंदील, फुलवाला चौक, महात्मा गांधी पुतळा, साक्री रोड, दत्त मंदिर परिसर व नेहरू चौकातील विक्रेत्यांची चांगलीत तारंबळ उडाली. अनेक विक्रेत्यांनी त्यांच्या वस्तू घेत घराकडे धाव घेतली; तर अनेकांनी पावसापासून वस्तूंचे संरक्षण व्हावे, यासाठी वस्तूंवर ताडपत्री टाकली.