लोकमत न्यूज नेटवर्कधुळे/शिंदखेडा : वादग्रस्त वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न धुळ्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी केला़ परंतु पोलिसांनी हा प्रयत्न रोखून प्रतिकात्मक पुतळा ताब्यात घेतला़ शहरातील महाराणा प्रताप चौकात पुतळा दहन करण्याचे नियोजन होते़दरम्यान, वारीस पठाण यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करीत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली़ देशाची शांतता व सुरक्षितता धोक्यात आणून राजकीय पोळी भाजपण्याचा प्रयत्न एमआयएमकडून सातत्याने होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे़यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, हिरामण गवळी, ओमप्रकाश खंडेलवाल, नगरसेवक नागसेन बोरसे, सुबोध पाटील, युवराज पाटील, उपमहापौर कल्याणी अंपळकर, प्रतिभा चौधरी, राहुल तारगे, अनिल थोरात, मनोज शिरुडे, शेवतकर, डॉ़ सुनील चौधरी, राकेश कुलेवार, शशी मोगलाईकर, रोहीत चांदोडे, जयश्री अहिरराव, रत्ना बडगुजर आदी उपस्थित होते़दरम्यान, शिंदखेड्यातही शिवसेनेतर्फे वारीस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन पोलिस निरीक्षक तिवारी यांना देण्यात आले़ यावेळी तालुका उपप्रमुख संतोष देसले, शहर प्रमुख नंदकिशोर पाटील, उप प्रमुख किशोर पाटील, संघटक सागर देसले, उपप्रमुख कपिल सूर्यवंशी, संतोष ठाकूर, भुपेंद्र देशमुख, गणेश परदेशी, सद्यम तेली, शोएब शेख, नाना पाहाडी, प्रशांत देवरे, दर्शन पवार उपस्थित होते़ लोकक्रांती सेनेतर्फे देखील शिंदखेड्यात पोलिसांना निवेदन देवून गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली़ यावेळी अध्यक्ष देवेंद्र पाटील, प्रकाश चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते़
धुळ्यात वारीस पठाणचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न, शिंदखेड्यातही निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 23:14 IST