शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

धरणांमधून विसर्ग सुरूच, सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 13:33 IST

धुळे जिल्ह्यातील स्थिती : दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज

धुळे : जिल्ह्यातील धरणांमधून विसर्ग सुरूच असून खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान ८ व ९ आॅगस्ट असे दोन दिवस मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस पूरस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.पांझरा नदीवरील अक्कलपाडा धरणातून बुधवारी सकाळी प्रतिसेकंद ८ हजार ५१५ क्युसेस विसर्ग करण्यात येत असून तो सुरूच ठेवून त्यात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार आहे. बुराई धरणातूनही प्रतिसेकंद १ हजार ९०० क्युसेस विसर्ग करण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने विसर्ग करून तसेच त्यात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. साक्री तालुक्यातील पांझरा (लाटीपाडा), मालनगाव व जामखेडी या प्रकल्पांमधून ओसंडणारे पाणी अक्कलपाडा धरणात येत असून पाऊसही होत असल्याने जलसाठ्यात वाढ होत आहे. त्याच पद्धतीने बुराई धरणाच्या साठ्यातही वाढ होत असल्याने विसर्ग करण्यात येत आहे.दरम्यान जिल्ह्यात ८ व ९ आॅगस्ट रोजी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला असून त्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :DhuleधुळेRainपाऊस