धुळे : सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेतर्फे आदर्शगाव वडगाव येथे प्रवेश प्रेरक उपक्रमांतर्गत सार्वजनिक ओटा बांधकाम व सुशोभीकरण, स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत जलशुध्दीकरण (आरओ) प्रकल्पाचे लोकार्पण खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले़महाराष्ट्र शासन पुरस्कृत आदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजने अंतर्गत सप्तशृंगी बहुद्देशीय महिला संस्था धुळे यांनी धुळे जिल्ह्यातील आदर्शगाव म्हणून वडगाव हे गाव दत्तक घेतले आहे.यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरविंद जाधव, मालेगाव भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, संस्था अध्यक्ष मीना भोसले, मंडळ कृषी अधिकारी आर. बी. पोतदार, धुळे तालुका पर्यवेक्षक डी. एस. जाधव, सरपंच विमलबाई भिल, उपसरपंच विठाबाई पाटील, ग्रामसेवक चेतन पाटील, ग्रामकार्यकर्ता नाना पाटील, पोलीस पाटील जगदीश पाटील, कैलास पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते़सप्तशृंगी महिला संस्था ही खरोखरच धुळे जिल्हात उत्तम काम करीत आहे. सार्वजनिक ओटा बांधकाम व सुशोभीकरण खरोखरच कौतुकास्पद आहे, अशा शब्दात खासदार भामरे यांनी सप्तश्रृंगी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले़सोशल डिस्टन्सिगचे पालन करुन कार्यक्रम झाला़ प्रत्येक व्यक्तीचे आॅक्सिजनचे प्रमाण व तापमान तपासण्यात आले़ तसेच मास्क वाटप करण्यात आले़यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बाविस्कर, गोकुळ देवरे, चंचल पवार, ग्रामसेवक चेतन पाटील, बंडू पाटील, नाना पाटील, जगदीश पाटील, कैलास पाटील, मुख्याध्यापक ओतारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कृषि सहायक सूर्यवंशी, पशूवैद्यकीय अधिकारी डॉ़ उकाडे यांच्यासह गावातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा कोरोनायोध्दा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला़संस्थेच्या अध्यक्षा मिना भोसले यांनी संस्थेने गेल्या १४ वर्षापासून राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली़कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकल्प संचालक हिरालाल भोसले, कृषी विभाग धुळे, वडगाव ग्रामपंचायत, नाना पाटील, कैलास पाटील, जगदीश पाटील, बंडू पाटील, सुपडू खैरनार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संतोष रंगराव पाटील, सप्तशृंगी महिला संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले़
वडगावला मिळणार आता शुध्द पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 22:10 IST