शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेसाठी आज मतदान

By अतुल जोशी | Updated: May 17, 2023 13:37 IST

विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या जिल्ह्यातील  ४७ ग्रामपंचायतीच्या ६१ जागा व थेट सरपंचपदाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झालेली होती.

धुळे  : जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेसाठी व शिरपूर तालुक्यातील अंतुर्ली येथील थेट सरपंचपद निवडीसाठी पोटनिवडणूक होत असून, त्यासाठी गुरूवारी मतदान होणार आहे. सदस्यपदासाठी १६ तर सरपंचपदासाठी तीन असे एकूण १९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत मतदान होणार आहे.

विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या जिल्ह्यातील  ४७ ग्रामपंचायतीच्या ६१ जागा व थेट सरपंचपदाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झालेली होती. मात्र ग्रामपंचायतींसाठी कमी कालावधी असल्याने, अनेकांनी ही पोटनिवडणूक लढविण्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. ८ मे रोजी अर्ज माघारीनंतर निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले. त्यात सदस्यपदाच्या २५ जागा बिनविरोध झाल्या. तर २८ जागांसाठी एकही अर्ज दाखल झालेला नव्हता.

दरम्यान आता धुळे तालुक्यातील सरवड, दह्याणे, धामणगाव,अजनाळे, साक्री तालुक्यातील नवेनगर, सुकापूर, कावठे व शिंदखेडा तालुक्यातील जखाणे येथील प्रत्येकी एका जागेसाठी गुरूवारी मतदान होणार आहे. आठ सदस्यपदासाठी १६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. तर शिरपूर तालुक्यातील अंतुर्ली येथे लोकनियुक्त सरपंचपदासाठी पोटनिवडणूक होत असून, याठिकाणी तीन उमेदवार रिंगणात आहेत.

सदस्य पदासाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी प्रत्येक गावात एक तर अंतुर्ली येथे तीन मतदान केंद्र असतील. १८ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत मतदान होणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी व एक शिपाई अशा पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. १९ मे रोजी सकाळी १० वाजता प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे