शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

दोन लाख मतदारांना मतदार चिठ्ठ्या वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 23:19 IST

महापालिका निवडणूक : अद्याप १ लाख मतदारांपर्यंत पोहचण्याचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिका निवडणूकीसाठी मतदारांना मतदार चिठ्ठयांच्या वितरणाचे काम २८ नोव्हेंबरपासून हाती घेण्यात आले होते़ त्यानुसार आतापर्यंत २ लाख १९ हजार ५३१ मतदारांना चिठ्ठयांचे वितरण झाल्याची माहिती मनपाचे उपायुक्त शांताराम गोसावी यांनी दिली़राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदारांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येत आहे़ मनपा निवडणूकीत ३ लाख २९ हजार ५६९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत़ त्यापैकी ६४ टक्के मतदारांना चिठ्ठयांचे वितरण झाले असून शनिवारी देखील उर्वरीत मतदारांना चिठ्ठया वितरीत केल्या जातील़ मनपा प्रशासनाकडून मतदान जागृतीसाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. मतदानाच्या दिवशी अनेक मतदारांना मतदार याद्यांमध्ये नाव न सापडण्याची अडचण निर्माण होते. यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहण्याची स्थिती निर्माण होत असते. ही स्थिती निर्माण होऊ नये म्हणून यासाठी निवडणूक आयोगाकडूनच मतदारांना चिठ्ठ्यांचे वाटप केले जात आहे.  ज्या मतदारांना चिठ्ठया मिळणार नाही, त्यांनी व्होटर सर्च अ‍ॅपवर आपले नाव शोधून मतदान केंद्राची माहिती घ्यावी, किंवा आपल्या भागातील मनपा लिपीकाकडून चिठ्ठया प्राप्त करून घ्याव्यात, असे आवाहन उपायुक्त शांताराम गोसावी यांनी केले आहे़ चिठ्ठया वितरणासाठी सुमारे ३२५ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली होती़ सायंकाळी सादर करावा लागतो अहवाल सकाळपासून बीएलओ, मनपा कर्मचारी व आशा वर्कर यांच्या माध्यमातून मतदार चिठ्ठ्यांचे वाटप केले जात आहे. प्रत्येक बीएलओंना स्वतंत्र प्रभाग व काही भाग विभागून देण्यात आले आहेत. सायंकाळी मतदार चिठ्ठ्यांचे वाटप झाल्यानंतर प्रत्येकाला दिवसभराचा संपूर्ण अहवाल निवडणूक विभागाकडे सादर करावा लागत आहे.  ज्या मतदारांचे पत्ते सापडले नाहीत, अशा मतदारांच्या चिठ्ठ्या निवडणूक विभागात जमा केल्या जात आहेत. तसेच मतदार चिठ्ठ्या वाटप करताना संबंधित मतदाराचा मोबाइल क्रमांक व सहीदेखील घेतली जात आहे. त्यानंतर सायंकाळी मनपा प्रशासनाकडून या मतदारांना मोबाइलद्वारे संपर्क करून त्यांना  मतदार चिठ्ठ्या  भेटल्या की नाही. याचीदेखील खातरजमा करून घेण्यात येत आहे.एका दिवसात करावे लागेल १ लाख १० हजार चिठ्ठयांचे वितरण़़मतदानाला आता केवळ आजचा दिवस शिल्लक असून उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे़ दरम्यान, मनपाने मतदार चिठ्ठया वाटपासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाºयांची ४ तारखेला बैठक घेतली होती़ त्यात ७ डिसेंबरपर्यंत सर्व चिठ्ठयांचे वितरण न झाल्यास शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा देण्यात आला होता़ मात्र ही मुदत संपुष्टात येऊनही अजून सुमारे १ लाख १० हजार मतदारांना चिठ्ठया वितरीत झाल्या नसून उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे़ मतदान केंद्रावरदेखील मनपाकडून मतदारांना मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्याची व्यवस्था केली जाऊ शकते़

टॅग्स :Dhuleधुळे