दराने येथील प्रेमसिंग गिरासे या युवकाचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी ८ सप्टेंबर रोजी शिंदखेडा पोलीस स्टेशनवर मार्केट कमिटीपासून पोलीस स्टेशनपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. याबाबत हेड कॉन्स्टेबल रमेश राजाराम माळी यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे त्यात म्हटले आहे की, सध्या कोरोना विषाणूची लागण सुरू असल्याने जिल्हाधिकारी यांनी ६ ते २० सप्टेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. जमावबंदी कायद्याचे उल्लंघन करून मोर्चा काढणाऱ्या गिरीशसिंह राजेंद्रसिंह परदेशी, प्रदेशाध्यक्ष राजपुताना फाउंडेशन महाराष्ट्र, आकाश गणेश परदेशी, तेजस लक्ष्मण जाधव, भावेश भगवानसिंग राजपूत, जयपाल भरतसिंग गिरासे, दिलीप दादाभाऊ गिरासे, अभिजित भरतसिंग राजपूत, जितेंद्रसिंग इंद्रसिंग राजपूत, भरतसिंग विजयसिंग राजपूत, संदीप केसरसिंग राजपूत, भोजेसिंग सुदामसिंग राजपूत, महेंद्रसिंग गुलमारसिंग राजपूत, सुजीत भटेसिंग राजपूत, सतीश हिलालसिंग राजपूत, विश्वास भीमसिंग राजपूत, शरद भीमसिंग गिरासे, मनोज लालसिंग पवार, समाधान बाबुलाल राजपूत, जयसिंग भीमसिंग गिरासे, बाळासाहेब इंद्रसिंग गिरासे, भारतसिंग नारायनसिंग गिरासेसह शिंदखेडा, शिरपूर परिसरातील नाव-गाव माहीत नाही, असे १५० ते १६० जणांविरोधात भादंवि कलम १८८, २६९ सह साथरोग प्रतिबंधक कायदा सन १८९७ चे कलम ३ व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २००५ चे कलम ५१ चे उल्लंघन तसेच मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमावबंदी आदेशाचे उल्लंघन; शिंदखेडा पोलिसांत १६० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:41 IST