लोकमत न्यूज नेटवर्कबभळाज : शिरपूर तालुक्यातील तरडी गावातील ९ व्यक्ती कोरोनाबाधीत आढळून आले आहे. या सर्वांचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. त्यानंतर प्रशासनाने संपूर्ण गाव लॉकडाऊन केले आहे. गावात प्रशासनस्तरावर आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.तरडी गावातील एक रुग्ण चोपाडा येथे पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यानंतर रुग्णाच्या संपर्कातील १२ ग्रामस्थांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी शुक्रवारी ९ लोकांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. तर दोन रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. गावातील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ९ रुग्णांपैकी ५ स्त्रिया आणि ४ पुरुष आहेत.शुक्रवारी पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रसन्न कुलकर्णी, गटविकास अधिकारी वाय.डी.शिंदे, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांनी गावाला भेट दिली. त्यांनी ग्रामस्थांना सर्तक राहण्याचे आवाहन केले. संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण करण्यात आले.तरडी गावात रुग्ण आढळून आल्याने शेजारच्या गावात भीतीचे वातावरण आहे.बभळाजला कोरोना संबंधी समितीची बैठक बोलविण्यात आली आहे. गाव इतर गावातील व्यक्तीसाठी बंद करण्यात आले आहे.एका प्रशासनाने सर्व सुचना देणे अपेक्षित आहे. मात्र तसे होतांना दिसत नाही.
तरडीत ९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने गाव ‘सील’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 13:26 IST