शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

व्हीव्हीपॅट यंत्रांबाबत मतदारांचे प्रबोधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 11:51 IST

साक्री तालुका : आष्टाणे येथे शुभारंभ, इव्हीएमद्वारे डमी मतदान घेऊन जनजागृती

 लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिन (इव्हीएम) व व्हीव्हीपॅट या मतदान घेण्याच्या यंत्रांबाबत जिल्हा निवडणूक विभागातर्फे मतदारांचे प्रबोधन करण्याच्या कार्यक्रमास रविवारी तालुक्यातील अष्टाणे येथे प्रारंभ झाला. युवा मतदारांंपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत साºयांनी डमी मतदानात  सहभाग नोंदविला. या यंत्रांची माहिती देऊन मार्गदर्शनही करण्यात  आले. तालुक्यात २३ ते २८ डिसेंबर या कालावधीत गावोगावी हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून अष्टाणे येथे त्याचा रविवारी सकाळी शुभारंभ झाला. यावेळी तहसीलदार संदीप भोसले, नायब तहसीलदार (निवडणूक) व्ही.डी. ठाकूर, अनिल जोणे, प्रवीण मोरे, सर्व मंडळाधिकारी, तलाठी व पथकातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार भोसले यांनी या दोन्ही यंत्रांसह त्यांच्या कार्य पद्धतीबाबत नागरिकांना माहिती दिली. त्यांनी उपस्थित केलेल्या शंका, प्रश्नांचे उत्तर देऊन त्यांचे समाधान केले.आपण ज्या उमेदवारास मतदान केले त्यालाच ते जात असल्याची खात्री करण्यासाठी यावेळी डमी मतदानही घेण्यात आले. मतदान केल्यानंतर ते ज्या उमेदवाराला केले त्याचा अनुक्रमणिका क्रमांक, त्याचे नाव व चिन्ह हे दर्शविणारी चिठ्ठी व्हीव्हीपॅट यंत्रावर दिसते. त्यानंतर ती सिलबंद कप्प्यात जाते. याबाबत मतदारांनी प्रत्यक्ष खात्री केली. यावेळी गावाच्या सरपंचांसह ग्रा.पं.चे सर्व पदाधिकारीव नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.तालुक्यातील विविध गावांसाठी ११ पथके नेमण्यात आली आहेत. ती सोमवार २४ रोजी विविध गावांमध्ये जाऊन या यंत्रांद्वारे मतदानाबाबत प्रबोधन व जनजागृती करणार आहेत. त्यासाठी गावोगावी दवंडीद्वारे नागरिकांना माहिती दिली जात असल्याचे तहसीलदार भोसले, नायब तहसीलदार ठाकूर यांनी दिली. आष्टाणे गावात आयोजित कार्यक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील वयोवृद्ध महिलांपासून तरुणी व तरुणांनीही याची माहिती जाणून घेतली तसेच त्याचा वापर कशापद्धतीने केला जाणार आहे, हे सुद्धा काळजीपूर्वक जाणून घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे