शहरातील वर्दळीच्या आणि ठिकठिकाणी वाहने पार्किंगसाठी जागा आहे़ ज्याठिकाणी वर्दळीला अडथळा ठरेल अशा ठिकाणी ‘नो-पार्किंग’चा बोर्ड प्रशासनाकडून लावलेला आढळून येतो. बऱ्याच जणांच्या तिकडे नजरा जात नाही़ अथवा त्यांच्याकडून बुद्धिपूर्वक हेतूने वाहने लावली जात असल्याचे सर्वश्रुत आहे. जवळपास पोलीस ठाण्यांमध्ये पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे़ त्या ठिकाणी वाहने उभी न करता जिथे ‘नो-पार्किंग’चा बोर्ड लावलेला आहे, अगदी तिथेच वाहने उभी केलेली आढळून येतात. याचा प्रत्यय धुळे तालुका पोलीस ठाण्यासह आझादनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर दिसून आलेला आहे.
नो-पार्किंगच्या जागेवरच वाहने
धुळे तालुका पोलीस स्टेशन
तहसील कार्यालयाच्या बाजूलाच धुळे तालुका पोलीस स्टेशन उभारण्यात आलेले आहे. ग्रामीण तक्रारी सर्वाधिक प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी अनेकांचा वावर असतो. प्रवेशद्वाराजवळच ‘नो-पार्किंग’चा बोर्ड लावलेला असताना तिथेच वाहने उभी करणे, गप्पा मारत थांबणे, नाहक गर्दी करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.
आझादनगर पोलीस स्टेशन
शहरातील पाच कंदिल आणि मच्छीबाजार परिसरात आझादनगर पोलीस स्टेशनची वास्तू उभारण्यात आलेली आहे. या ठिकाणचा परिसर तसा संवेदनशीलच असल्यामुळे लहान मोठ्या स्वरूपाच्या तक्रारी रोजच दाखल होत असतात. शिवाय बाजारपेठ असल्यामुळे सुद्धा अनेक जण पोलीस स्टेशन असल्याने वाहने पार्किंग करून मोकळे होताना दिसून येतात.
शहरातील पोलीस ठाण्यांना
पार्किंगची सोय उपलब्ध
- शहरात सात पोलीस स्टेशन आहेत. या प्रत्येक पोलीस स्टेशनच्या बाहेर स्वतंत्र पार्किंगची सोय पूर्वीपासूनच उपलब्ध आहे.
- परंतु दिवसेंदिवस प्रत्येक पोलीस स्टेशनचा कारभार हा वाढत आहे. तक्रारीदेखील जास्त प्रमाणात दाखल होत असल्याने वाहने लावलेली आढळतात.
- पार्किंगची सोय असूनही बिनधास्तपणे अनेकांकडून वाहने ही ‘नो-पार्किंग’ची ठिकाणी अगदी बोर्डाला लागूनच केली असल्याचे दिसून येते.
(कोटसाठी)
वाहनधारकांनी आपली वाहने ही शिस्तीत लावायला हवी. ‘नो-पार्किंग’च्या ठिकाणी वाहने लावू नये. अशा ठिकाणी वाहने आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.
- संगीता राऊत, सहायक पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा
२०१९ : १२४
२०२० : २३
२०२१ मेपर्यंत : १६