शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सोनगीरजवळ धुळे पोलिसांचे वाहन उलटले, पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 11:55 IST

शिंदखेडा बंदोबस्तासाठी जात असताना घडला अपघात 

ठळक मुद्देसोनगीर ते दोंडाईचा रस्त्यावरील घटनाट्रकच्या हुलकावणीमुळे पोलीस वाहन उलटलेपाच पोलीस जखमी, सुदैवाने जिवीतहानी टळली

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे/सोनगीर : शिंदखेडा नगरपंचायती प्रचार सभेच्या बंदोबस्तासाठी जात असलेले धुळे पोलिसांचे वाहन उलटून झालेल्या अपघातात पाच पोलीस किरकोळ जखमी झाले़ हा अपघात दोंडाईचा - सोनगीर रस्त्यावरील सोमेश्वर मंदिराजवळ आज सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास घडला़ जखमी पोलिसांवर सोनगीर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत़ शिंदखेडा नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या आज वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारसभा आहेत़ त्या अनुषंगाने बंदोबस्तासाठी पोलीस एमएच १८ जी ०२५७ क्रमांकाच्या वाहनाने धुळ्याकडून शिंदखेडाकडे जात होते़ सोनगीर ते दोंडाईचा रोडवर सोमेश्वर मंदिराजवळ हे वाहन जात असताना त्याचवेळेस नंदूरबारकडून धुळ्याकडे भरधाव वेगाने येणाºया ट्रकने पोलीस वाहनाला कट मारला़ अपघात होऊ नये यासाठी पोलिसांनी वाहन रस्त्याच्या बाजूला घेतले़  राज्य महामार्गाचे काम सुरु असल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या खडीच्या ढिगाºयावर पोलिसांचे वाहन गेल्याने ते उलटले आणि रस्त्याच्या बाजूला  खड्यात पडले़ अपघात होताच चालक वाहनासह फरार झाला़ या अपघातात धुळ्याचे पोलीस उपनिरीक्षक सी़ डी़ शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल ए़ डी़ ईशी, आऱ के़ मोरे, बी़ ओ़ चव्हाण, एस़ एच़ पोटगिर जखमी झाले आहेत़ त्यांना उपचारासाठी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे़ दरम्यान, या वाहनात बॉम्बशोधक निकामी करण्याचे साहित्य होते़ या अपघातामुळे या साहित्याचे नुकसान झाले का, हे तपासले जात आहे़