कोरोना लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. कोविड वरील लसीकरणाला मान्यता मिळाली आहे. त्यानुसार ८ जानेवारी रोजी जिल्ह्यात चार ठिकाणी ड्राय रन घेण्यात आला. आता १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरण मोहिमेस सुरवात होईल. त्याचे नियोजन आरोग्य विभागाने करावे. लसीकरण केंद्रांवर शीतपेटी, लस वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ज्या कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येईल त्यांना लसीकरणाची माहिती द्यावी. लसीकरण केंद्रावर आवश्यक साधनसामग्री, इंटरनेट, वीज पुरवठा, सुरक्षितता आदी बाबींची पडताळणीचे आदेश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले.
१० हजार १४७ कर्मचाऱ्यांना लस
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून ग्रामीण भागात चार, तर शहरी भागातील तीन केंद्रांवर लसीकरण करण्यात येईल. त्यासाठी १० हजार १४७ आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रांवर दर दिवशी १०० जणांना कोविड लस देण्यात येईल.