शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

रामसिंग नगरात एकास मारहाण लोखंडी रॉडसह काठ्यांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 22:05 IST

शिरपुरातील घटना : सहा जणांविरुध्द गुन्हा

धुळे : पूर्ववैमनस्यातून एकाला लोखंडी रॉडने तर, त्याला वाचविण्यासाठी आलेल्या दोघांना काठीने मारहाण केल्याची घटना १५ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शिरपुर येथील रामसिंग नगरात घडली़ याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात ६ जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल झाला़शिरपुर तालुक्यातील उंटावद येथील अनिल जामसिंग पारधी (२६) या तरुणाला शिरपुर येथील रामसिंग नगरात फोन करुन बोलाविण्यात आले़ त्याच्यासोबत भाऊ राजेंद्र व भैय्या नामक दोघे होते़ अनिल हा येताच त्याच्याशी उज्जत घालत शाब्दिक वाद घालण्यात आला़ वादाचे पर्यवसान अचानक हाणामारीत झाल्याने रामसिंगनगरात काही प्रमाणात धावपळ उडाली़ या हाणामारीत लोखंडी रॉडचा सर्रासपणे वापर झाला़ अनिलचे हात धरुन दुसऱ्याने त्याच्या पायावर लोखंडी रॉडने वार केल्याने त्यात त्याला गंभीर दुखापत झाली़ हे पाहून त्याचा भाऊ राजेंद्र आणि भैय्या हे त्याला वाचविण्यासाठी आले असता त्यांच्यावर काठीने हल्ला चढविण्यात आला़ या हाणामारीत तिघांना दुखापत केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाले़ यानंतर तिघांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमी झालेल्या अनिल पारधीने शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ त्यानुसार लखन भील, अण्णा भील, मोहन भील (तिघे रा़ रामसिंग नगर, शिरपूर), मायकल (पूर्ण नाव माहित नाही), सतिष शिरसाठ, छगन कमलाकर शिरसाठ (दोन्ही रा़ खर्दे ता़ शिरपूर) यांच्या विरोधात भादंवि कलम १४३, ३२४, १४४, १४७, १४८, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जी़ एऩ सत्तेसा करीत आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे