शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बुडताना आरडाओरड केली, पण कुणीच नसल्याने जीव गमावला

By देवेंद्र पाठक | Updated: October 31, 2023 18:14 IST

तोंदे शिवारातील घटना : शेतातील डबक्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

धुळे : शेतशिवारात तयार करण्यात आलेल्या पाण्याच्या डबक्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शिरपूर तालुक्यातील ताेंदे शिवारात सोमवारी दुपारी घडली. प्रदीप रमेश पाटील (वय ३९) असे मृताचे नाव आहे. थाळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. शिरपूर तालुक्यातील तोंदे येथे राहणारे प्रदीप रमेश पाटील (वय ३९) यांची गावशिवारात शेती आहे पण गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्यामुळे ते शेतात गेलेले नव्हते.

सोमवारी दुपारी शेतात गेल्यानंतर त्यांना पाण्याचे मोठे डबके दिसून आले. डबक्याची पाहणी करत असताना ते डबक्यात पडले. पाणी आणि गाळ जास्त असल्याने त्यात ते रुतले गेले. पाण्यात बुडत असताना त्यांनी आरडाओरड केली; पण परिसरात कोणीही नसल्याने त्यांना वाचविण्यासाठी काेणीही येऊ शकले नाही. ते पाण्यात पडून होते. ही घटना लक्षात येताच त्यांना तातडीने बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. थाळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस हेड कॉन्स्टेबल एस. के. वळवी घटनेचा तपास करीत आहेत.