शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
2
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
3
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
4
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
5
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
6
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
7
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
8
Chaturmas 2025: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
9
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
10
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
11
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
12
कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही; अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर भारताची स्पष्टोक्ती
13
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
14
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे (Watch Video)
15
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
16
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
17
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
18
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
19
एकेकाळी दारुचे पाट वाहिलेल्या दिल्लीत, प्रचंड बिअर टंचाई; भलेभले ब्रँड शोधूनही सापडत नाहीत...
20
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या

७४ पेैकी ४५ नगरसेवक ठरले ‘मौनीबाबा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 23:24 IST

फेब्रुवारी ते डिसेंबरअखेर पाच झाल्यात महासभा

ठळक मुद्देत्यांची फक्त अभिनंदनाची भूमिकाविकास कामांव्यतिरिक्त चर्चा..टॉप टेन नगरसेवकसत्ताधारी झालेत विरोधक : भाजपचे ५० नगरसेवक

चंद्रकांत सोनार ।लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिकेत प्रभागाचे प्रतिनिधीत्व करणारे नगरसेवक संजय जाधव यांनी वर्षभरात झालेल्या सभेतून सर्वाधिक ३० प्रश्न विचारले आहेत तर नागसेन बोरसे हे २३ प्रश्न उपस्थित करणारे दुसरे नगरसेवक ठरले आहेत़ दरम्यान ७४ पैकी २५ नगरसेवकांनी प्रश्न विचारले तर अन्य ४५ नगरसेवकांनी केवळ श्रध्दांजली व अभिनंदन करण्याचा ठराव करण्याची भूमिका बजावत मौनीबाबा ठरले आहेत़महापालिकेवर दहा वर्ष राष्ट्रवादी- काँग्रेस पक्षाची सत्ता होती़ त्यामुळे अनेक वर्ष भाजपला सत्तेपासून दुर राहावे लागले होते़ भाजपने महापालिकेवर एकहाती सत्ता मिळविण्यासाठी आघाडीच्याच नगरसेवकांना भाजपतर्फे उमेदवारी दिली. त्याचा परिणाम मनपा निवडणुकीत ५० जागा मिळवित भाजपने एकहाती सत्ता प्रस्थापित केली. महापौर निवडीची पहिली सभा २८ फे ब्रुवारी २०१९ रोजी झाली. यावेळी १९ प्रभागातून निवडून आलेल्या ७४ पैकी ३ नगरसेवकांनी दांडी मारली़ पहिल्या सभेनंतर लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागु झाली़ त्यामुळे ४ महिन्यानंतर २६ जुन २०१९ रोजी घेण्यात आलेल्या दुसऱ्या सभेत ७४ पैकी ५९ नगरसेवक उपस्थित होते़ तर १५ नगरसेवकांनी दांडी मारली होती़५ पैकी ३ सभेत विचारले प्रश्न- महापौर निवडीनंतर २८ फे ब्रुवारी २०१९, २९ जुलै, २६ जुलै रोजी ३ सभा घेण्यात आल्या होत्या़ त्यात शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, महिला व बाल कल्याण, बांधकाम, पाणीपुरवठा या विषयांवर संजय जाधव सर्वाधिक ३० प्रश्न विचारलेले आहेत़ तर त्यात नागसेन बोरसे २३, शितल नवले २२, हर्षकुमार रेलन १८, प्रतिभा चौधरी ८, प्रदिप कर्पे ५, अमिन पटेल ४, सुनिल बैसाणे ३, साबिर शेख यांनी २ प्रश्न विचारलेले आहेत़ तर अन्य १५ नगरसेवकांनी १ प्रश्न विचारला होता़ असे एकूण ११६ प्रश्न विचारले आहे.४५ नगरसेवक का गप्प- ७४ पैकी ४५ नगरसेवक पुरूष तर २९ महिला नगरसेविका आहेत़ काही नगरसेवक उच्चशिक्षित व कामांचा अनुभव असल्याने त्यांनी सभागृहात चर्चा केली़ मात्र काही पहिल्यांदा निवडून आलेल्या नगरसेवकांनी सभेत मौन बाळगले़त्यांची फक्त अभिनंदनाची भूमिकाच्७४ नगरसेवकांपैकी बोटावर मोजण्या इतकेच नगरसेवकांना चांगल्या पध्दतीने बोलता येत़ तर काही पहिल्यांदाच निवडून नगरसेवक झाले आहे़ त्यामुळे आपल्या नावाची देखील दखल महासभेत घेतली जावी म्हणून वर्षभरात त्यांनी केवळ अभिनंदन व श्रध्दाजंली असा ठराव करण्यात योगदान दिलेले दिसून आले़विकास कामांव्यतिरिक्त चर्चा..च्आपल्या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करणाºया काही नगरसेवकांनी प्रभागातील विकास कामांविषयी न बोलता राजकीय कुरापती काढण्याकडे जास्त भर दिला होता़ तर काहींनी फक्त शंभर टक्के उपस्थिती राहण्यासाठी सभागृहात हजेरी लावली होती़कसा झाला विकास ?च्महालॅबचा दिलासा : गरीब व गरजु रुग्णांसाठी मोफत रक्त तपासणी होण्यासाठी मनपाच्या १७ प्राथमिक आरोग्य केंद्रात महालॅब योजनेअंतर्गत रक्त तपासणी केली जात आहे़च्बांधकाम परवानगी सुलभ : मनपा नगररचना विभागाकडून शहरातील बांधकामांना आॅनलाईन परवानगी दिली जात आहे़ त्यामुळे नागरिकांचा वेळ तर मनपाला कोट्यावधींचा विकास वसुल होत आहे़च्अतिक्रमण मुक्त मॉडल रोड : नागरिकांना चांगले मजबूत, टिकाऊ रस्ते मिळावे, सोबतच शहराच्या सौंदर्यात भर पडावी़ यासाठी रेल्वे स्टेशन रोड अतिक्रमण मुक्त करून १० कोटी रुपयांचा निधीतून या रस्त्याचा विकास होत आहे़च्कचरा संकलनासाठी घंटागाड्या : शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मनपाने २५ कोटी रूपयांचा निधीतून ७९ घंटागाड्यांच्या खरेदी केल्या आहेत़ त्यानुसार प्रत्येक प्रभागासाठी एक घंटागाडी ३० दिवस कचरा संकलनाचे कार्य करते़वर्षभरात काय घडले ?च्२७ विषय मंजूर : लोकसभा निवडणूकीची आचार संहिता लागू होण्याआधी फेबु्रवारी महिन्याच्या अखेर सभा घेण्यात आली़ त्यात १२ मिनीटाच्या सभेत २७ विषयांना मंजूरी देण्यात आली़च्सत्ताधारी झालेत विरोधक : भाजपच्या नगरसेवकांनी जयहिंद रस्त्याला विरोध, कचरा संकलक ठेकेदारावर आरोप, मनपाच्या तिजोरीवर डल्ला मारत मारणाºयावर शिक्कामोर्तब केला़च्मनपाचा अर्थसंकल्प सादर : २६ जुलै २०१९ रोजी झालेल्या महासभेत मनपाचा पहिला ३५८ कोटी १९ लाखांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता़महापौरांचे सभागृह त्याग: विकास प्रभागातील कामे होत नसल्याने सत्ताधारी नगरसेवकांनी सभेत ठिय्या दिला. तर उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी देखील सभागृह त्याग केला होता़वादग्रस्त विषयांवर सभेत दबावतंत्र....च्मनपात भाजपचे ५० नगरसेवक आहे़ त्यामुळे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून दबाव तंत्र वापरले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे..याविषयांवर झाली अधिक चर्चा....च्स्वच्छता, अनियमित पाणीपुरवठा, मोकाट जणावरे व कुत्रे, रस्ते, घंटागाडीच्या तक्रारी अशा प्रश्नावर नगरसेवकांनी सर्वाधिक प्रश्न स्थायी व महासभेत उपस्थित केलेले आहेत़बेघरांना मिळणार हक्काचा ७/१२...च्बेघर कुुटुंबांना घर देण्याची महत्वकांशी मोहिम महापालिकेने हाती घेतली आली आहे़ त्यानुसार घोषित, अघोषित, गावठाण १२४ जागा अतिक्रमीत जागेवरील नागरिकांना सात बारा मिळण्यासाठी ठराव केला आहे़टॉप टेन नगरसेवकसदस्य प्रश्नसंजय जाधव ३०नागसेन बोरसे २३शितल नवले २२हर्षकुमार रेलन १८प्रतिभा चौधरी 0८प्रदिप कर्पे 0५अमिन पटेल 0४सुनिल बैसाणे 0३साबिर शेख 0२१५ नगरसेवकांनी विचारले- ०१

टॅग्स :Dhuleधुळे