शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

वाहून जाणाऱ्या दुचाकीस्वार जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 22:02 IST

अमराळे येथील घटना : फरशी पुलावरून जात असतांना पाण्यात वाहून जात होता

शिंंदखेडा : वाडी शेवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने तालुक्यातील अमराळे येथील बुराई नदीवरील फरशी पूलावरून पाण्याचा प्रवाह सुरू असतांना दुचाकीस्वार पुल ओलाडतांना दुचाकीसह पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असतांना काही गावातील तरूणांच्या मदतीने त्यांला वाचविण्यात आले़पत्नीला माहेरून घेण्यासाठी दुचाकीवरून वडणे-बुरझड येथील निघालेला अरुण आत्माराम शिंदे वय २६ हा तरूण दुचाकीवरून वडणे गावावरून अमराळेमार्गे नंदूरबारकडे जात असतांना अमराळे गावाजवळ लागणाºया बुराई नदीवरील तळफरशी पुलावरुन पाण्याचा प्रवाह सुरू असतांना देखील शिंदे यांने पाण्यातून पुल ओलाडण्याचा प्रयत्न केला़ यावेळी काही तरूणांनी त्याला पुल ओलाडण्यासाठी विरोध देखील केला होता़ मात्र तरीही त्याने पुलावरून दुचाकीने जाण्याचा प्रयत्न केला़ दरम्यान पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शिंदे हा दुचाकीसह पाण्यात दिशेन वाहू लागला होता़ ही घटना नदीकाठावर बसलेले अमराळे येथील सुनील पंडित बोरसे, खंडू निंबा पाटील यांच्यासह काही तरुणांच्या लक्षात आल्याने त्यांनी पाण्यात उड्या टाकून तरुणाला पाण्यातून बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले़ तरूणांच्या धाडसाचे सर्वत्र कौंतुक होत आहे.हा फरशी पुल धुळे व नंदूरबार जिल्ह्याला जोडणारा आहे़ येथे छोटा पुल होण्यासाठी अनेक वर्षापासून अमराळे ग्रामस्थांची मागणी आहे़ मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अशा घटना घडतात़

टॅग्स :Dhuleधुळे