शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

दोन हजार महिला मजुरांना वाटले सनकोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 22:51 IST

चिमठाणे ग्रामपंचायतीचे प्रेरणादायी कार्य : प्रतिकूल परिस्थितीत बचावासाठी उपाय; अन्य ग्रा.पं.पुढे ठेवला आदर्श

भिका पाटील।शिंदखेडा : तालुक्यातील चिमठाणे ग्रामपंचायततर्फे नेहमीच लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून शेतात काम करणाऱ्या सुमारे दोन हजार महिला मजुरांना प्रतिकूल वातावरणाच्या बचावासाठी सनकोटचे वाटप करण्यात आले.ग्रामपंचायत गावातील गरजू महिलांच्या रोजच्या गरजा ओळखून विविध उपक्रम राबवित असते. त्याची तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींसमोर आदर्श ठेवला आहे. गावातील शेतात काम करणाºया महिलांना उन्हाचा त्रास मोठ्या प्रमाणात होत होता म्हणून ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगातून दोन हजार महिलांना सनकोटचे वाटप केले.या अगोदरही ग्रामपंचायतीने महिलांसाठी ठिकठिकाणी लाखो रुपये खर्च करून सॅनिटरी नॅपकीनचे मशीन बसवून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. या कामासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र गिरासे यांचे योगदान व सहकार्य नेहमीच असल्याचे सरपंच खंडू भिल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.चिमठाणे, दलवाडे, पिंपरी ही ग्रुप ग्रामपंचायत सहा-सात महिन्यांपासून गावातील गरजूंना त्यांच्या गरजा ओळखून विविध प्रकारचे साहित्य ग्रा.पं.ला प्राप्त झालेल्या फंडातून त्यांना वस्तू रुपात पुरवते.गावातील महीला ह्या शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकतात. शेतात काम करतांना त्यांना ऊन, थंडी व पावसाचा सामना करावा लागतो. तसेच अनेक वेळा कपाशी वेचतांना खाली कपाशीच्या बोंडाचे अणुकूचीदार टोक हाताला लागून जखमाही होतात. या त्रासापासून महिलांची सुटका व्हावी, यासाठी ग्रामपंचायतने १४व्या वित्त आयोगातून इतर कामे न घेता दोन हजार सनकोट खरेदी केले. आणि सरपंच खंडू भिल, योगेंद्र गिरासे व ग्रा.पं. सदस्यांसह कर्मचाऱ्यांंनी ते घरोघरी विरेंद्र्रसिग गिरासे यांच्या सहकार्याने वाटप केले.सनकोट दिल्यानंतर महिला मजुरामध्ये आनंदाचे वातावरण आहे. या ग्रामपंचायतीने यापूर्वीही लाखो रुपये खर्चून दलवाडे गाव, प्राथमिक आरोग्य केंद्र व जनता हायस्कूल अशा तीन ठिकाणी सॅनिटरी नॅपकीन वेडिंग मशीन बसवले आहेत. त्यात पाच रुपयांचे नाणे टाकून सॅनिटरी नॅपकीन प्राप्त करून त्याचाही फायदा गावातील महिला घेत आहेत. याबाबत जनजागृतीसाठी आशा वर्कर्सची मदत घेतली जात असून त्यांच्याकडेही सुटे नॅपकीन देऊन त्यांना त्या मोबदल्यात स्वत: योगेंद्र गिरासे नॅपकीनमागे विशिष्ट रकमेचे योगदान देतात, असेही सरपंच भिल यांनी सांगितले. महिलांच्या दैनंदिन गरजा ओळखून त्यांच्या समस्यां समजून अशा पद्धतीने काम करणारी ही ग्रा.पं. इतरांसाठी आदर्श व प्रेरणायी ठरणारी आहे.

टॅग्स :Dhuleधुळे