शहरातील अंबिका नगरात राहणारे घनश्याम मोहनलाल बिसावा (५६) या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडे १९ ते २३ फेब्रुवारी दरम्यान चोरट्यांनी चोरी करुन १ लाख २ हजार रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास सुरू असतानाच दोन चोर शंभरफुटी रोड भागात चोरुन घेतलेल्या ऐवजची विक्री करण्याच्या उद्देशाने ग्राहक शोधत आहेत, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. माहिती मिळताच पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत, योगेश ढिकले, पोलीस कर्मचारी शेख, भुरा पाटील, प्रेमराज पाटील, मुख्तार शहा, स्वप्नील सोनवणे, चेतन झोलेकर, सुशील शेंडे, संदीप वाघ, सोमनाथ चौरे यांनी सापळा लावला. पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात इम्रान उर्फ चाट्या रफिक शेख (२१, रा. दोन हजार वस्ती, इब्राहिम मशीदजवळ, धुळे) आणि शोएब उर्फ बबल्या शेरु पिंजारी (२३, रा. अंबिकानगर, धुळे) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीला गेलेला काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून उर्वरित तपास सुकरू आहे.
शंभरफुटी रोडवरुन दोघा चोरट्यांना सापळा लावून पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:10 IST