धुळे - जिल्हा रूग्णालयातील प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी दोन रूग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. धुळे शहरातील भोई गल्ली येथील एका व्यक्तीचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तसेच नाशिक येथील एका रूग्णाचा समावेश आहे. शुक्रवारी देखील भोई गल्ली येथील सात रूग्णांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले होते. भोई गल्ली परिसरातील एकूण नऊ रूग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे.
दोन रूग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 19:37 IST