शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

दिवाणमळ्यात मारहाण करुन बळजबरीने एका टोळीने लुटले दोन लाखांचे लोखंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 21:06 IST

लोखंडाच्या सळई बळजबरीने चोरून नेल्याची घटना

धुळे : हाफ पॅन्ट, टी शर्ट तर काहींनी स्वेटर परिधान करुन आलेल्या एका टोळीने वृध्दाला मारहाण केली. त्याच्या ताब्यातील लोखंडाच्या सळई बळजबरीने चोरून नेल्याची घटना धुळे तालुक्यातील दिवाणमळा शिवारात शुक्रवारी पहाटे घडली. चोरुन नेलेले लोखंड हे २ लाख २५ हजार रुपये किंमतीचे आहे. मोहाडी पोलीस ठाण्यात एका टोळीविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.धुळे तालुक्यातील दिवाणमळा शिवारात डी फॉर्मसी कॉलेज आहे. या कॉलेजच्या आवारात बांधकामासाठी लागणारे लोखंड ठेवलेले होते. त्याच्यावर देखरेख करण्यासाठी भुरा सुका सोनवणे (७२, रा. दिवाणमळा ता. धुळे) हा वॉचमन म्हणून कार्यरत होता. १३ नोव्हेंबर रोजी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास २५ ते ३० वयोगटातील ८ ते ९ जण आले. त्यातील काहींच्या अंगात स्वेटर तर काहींनी हाप पॅन्ट व टी शर्ट परिधान केलेला होता. त्यांनी जवळ येऊन दमदाटी व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने त्याच्या हातातील लोखंडाच्या सळईने उजव्या पायाच्या गुडग्यावर व उजव्या पंजावर मारहाण केली. त्यानंतर एका ट्रकामध्ये लोखंड भरण्यास सुरुवात केली. त्यात ४५ हजार टन प्रमाणे ४ ते ५ टन लोखंडाची सळई असा एकूण २ लाख २५ हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. हा सर्व ऐवज ट्रकमध्ये भरुन चोरुन नेला.जखमी अवस्थेत असलेल्या भुरा सोनवणे यांनी मदतीसाठी हाक मारल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. जखमी अवस्थेतच सोनवणे यांना रुग्णालयत दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी इम्रान हुसनोद्दीन खाटीक (३०, रा. शिवपार्वती कॉलनी, देवपूर धुळे) यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात १३ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली. त्यानुसार भादंवि कलम ३९५, ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. पोलीस उपनिरीक्षक एम. आय. मिर्झा तपास करीत आहेत

टॅग्स :Dhuleधुळे