शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वारांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 20:59 IST

अपघात : दोन वेगवेगळ्या घटना

धुळे : शहरातील चाळीसगाव रोडसह सरवड ते लामकानी रस्त्यावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही अपघाताच्या घटना या राज्य परिवहन महामंडळाच्या बसमुळे झाल्या असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. दोन्ही अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले आहे.चाळीसगाव रोडवरील अपघातएमएच १८ एमए ०९६४ क्रमांकाच्या दुचाकीने संतोष चोरसिया हा भाईजी नगरात असलेल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जात होता. शहरातील चाळीसगाव रोडवरील शंभर फुटी रोडच्या क्रॉसिंगजवळ सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एमएच १३ सीयू ७४९२ क्रमांकाची बीडकडून धुळ्यातील बसस्थानकाकडे येणाऱ्या बसने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात तो रस्त्यावर फेकला गेला. बसच्या चाकाखाली आल्याने तो फरफटत गेला. गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या सोबत त्याची आई वर्षा चोरसिया (५८) या देखील होत्या. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी चाळीसगाव रोड पोलिसांनी धाव घेतली. त्यांनी तात्काळ मदत करुन जखमी आणि मृत तरुणाला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळाली असता उपमहापौर कल्याणी अंपळकर या देखील पोहचल्या होत्या. शंभर फुटी रोडवर गतिरोधकाची मागणी त्यांनी केली.लामकानी रस्त्यावरील घटनाधुळे तालुक्यातील लामकानीकडून सरवडकडे एमएच ११ बीएन ९२८० क्रमांकाच्या एसटी बसने सरवडकडून नंदाणे गावाकडे जाणारी एमएच १८ एव्ही १३४० क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघाताची ही घटना रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वार अनिल रतिलाल पाटील याच्या डोक्याला जबर मार लागला. परिणामी त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात बसचालक जगदीश भास्कर वाघ (रा. कुसुंबा ता. धुळे) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.