तर प्रवीण सखाराम भिल याने परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, २ जून रोजी रात्री ९.३० वाजता द्वारका नगरातील चौकात एकलव्य पुतळ्याजवळ गप्पा मारत असताना विकास राजेंद्र पाटील याने येथे गप्पा का मारतात, येथे बसायचे नाही असे म्हणत वाद घातला. तसेच शिवीगाळ करीत हाताबुक्क्यांनी मारहाण केली. विकास पाटील याने हातातील लोखंडी रॉडने प्रवीण भिलच्या डोक्यावर मारून दुखापत केली. यावरून विकास पाटील, रावसाहेब पाटील, दगा यादव पाटील, नवल यादव पाटील, अमोल दगा पाटील (सर्व रा. बाळापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी रावसाहेब पाटील व अमोल पाटील यांना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींना अटक केलेली नाही. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक आर.व्ही. मोरे करीत आहेत.
बाळापूर येथे दोन गटात हाणामारी, दुचाकीची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:26 IST