शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

धुळे जिल्ह्यातील ४५०० कर्मचारी संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 22:50 IST

जिल्हा प्रशासनाला निवेदन : शाळा ओस, जिल्हा परिषदेतही कर्मचा-यांची नगण्य उपस्थिती

धुळे  :  जुनी पेंशन योजना लागू करावी, सर्व संवर्गातील वेतन त्रुटी दूर कराव्यात यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्या धुळे शाखेतर्फे सोमवारी लाक्षणिक संप पुकारण्यात आला. संपात जिल्हा परिषदेचे शिक्षक व विविध संवर्गातील  ५ हजार ६६४  कर्मचाºयांपैकी ४५०० कर्मचारी सहभागी झाले होते.१ हजार १६४ कर्मचारी कामावर होते. दरम्यान    शिक्षक संपावर गेल्याने जि.प. शाळा ओस पडल्या होत्या. तर जिल्हा परिषदेत कर्मचाºयांची उपस्थितीही  नगण्यच होती. जि.प.तील काही विभागांचे तर कुलूपही उघडण्यात आलेले नव्हते. संघटनेच्या अनेक मागण्या प्रलंबित आहे. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेतर्फे आज सकाळी क्युमाईन क्लब समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यातील बहुतांश कर्मचाºयांनी ‘जुनी पेंशन योजना लागू झाली पाहिजे’ अशा घोषणा असलेल्या टोप्या घातल्या होत्या. दुपारी साडेवाजेंनंतर संघटनेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले. यावेळी  जिल्हा समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष शिवानंद बैसाणे जिल्हा सरचिटणीस किशोर पाटील, रविंद्र खैरनार, गमन पाटील, शरद सूर्यवंशी, भगवंतराव बोरसे, राजेंद्र नांद्रे, नविनचंद्र भदाणे, चंद्रकांत पाटील, हारुण अन्सारी,अकिल शेख, विजय पाटील,चंद्रकांत सत्तेसा,भूपेश वाघ, प्रविण भदाणे, राजेंद्र भामरे, सुरेंद्र पिंपळे, योगेश धात्रक, ज्ञानेश्वर बाविस्कर,रविंद्र पाटील, धिरज परदेशी, ज्ञानेश्वर पवार, साहेबराव गिरासे, भटू पाटील, संजय पाटील, जिल्हा परिषद युनियनचे जिल्हाध्यक्ष दिनेश महाले, कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पगारे, जि.प. लिपीकवर्गीय गटनेते वनराज पाटील, देवेंद्र पाटील, रंजना साळुंखे, धनराज पाटील, भानुदास पाटील, एकनाथ चव्हाण, अनिल बैसाणे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. जि.प. शाळा १०० टक्के बंदजिल्हा परिषद शाळांचे  शिक्षक या लाक्षणिक संपात सहभागी झाल्याने, जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा सोमवारी बंदच होत्या. तसेच जिल्हा परिषदेचे कर्मचारीही या संपात सहभागी असल्याने, जिल्हा परिषदेतील शिक्षण, ग्रामपंचायत आदी विभागाचे कार्यालयाचे दरवाजेही उघडले नव्हते. जि.प.त सर्वत्र शुकशुकाट होता. मनपा शिक्षकांचा पाठींबाशिक्षक समन्वय समिती मनपा शिक्षण मंडळ धुळे यांचा महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय समितीच्या जुनी पेन्शन व कुटूंबवेतन साठी पुकारलेल्या बंदला काळ्या फिती लावून काम करून जाहिर पाठींबा दिला़ प्रसंगी शिक्षक समन्वय समिती मनपा शिक्षण मंडळ धुळेचे अध्यक्ष शरद पवार, रीयाज, वशिमराजा, मेहमुद, सागर मोरे, उज्वल बोरसे, फारुख, गणेश सुर्यवंशी, नफिस, सुनिल चव्हाण, निसार, मुद्दत, अश्पाक, रत्ना गुजर, रुपाली मनिखेडकर, फरीन अंजूम, सिमा महाले, रचना बनसोड, आलीया, फैजिया उपस्थित होते़ शिरपूरला आंदोलनशिरपूर : जुनी पेन्शन व विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी ९ रोजी येथील तहसिल कार्यालयाच्या बाहेर लाक्षणिक संप पुकारला होता. त्यानंतर तहसिलदार चंद्रशेखर देशमुख यांना या संदर्भातले निवेदन दिले.  शासनाने जुनी पेंशन योजना व इतर प्रमुख १३ मागण्याना मंजुरी मिळावी़ अन्यथा, पुन्हा संपावर जाण्याचा इशारा कर्मचारी संघटनांच्यावतीने जुनी पेंशन संघाचे जिल्हाध्यक्ष शंशाक रंधे यांनी दिला. यावेळी शरद सूर्यवंशी, भगवंत बोरसे, चंद्रशेखर पाटील यांनी मार्गदर्शन केले. संप काळात तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा १०० टक्के बंद, आश्रम शाळा १०० टक्के बंद तर आरोग्य विभाग, माध्यमिक विद्यालयातील इतर विभागातून संमिश्र सहभाग नोंदवला असल्याचे दिसून आले़साक्रीत निवेदनसाक्री : साक्री तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्यावतीने नायब तहसीलदार अंगत आसटकर यांना जुनी पेन्शन व विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ यावेळी विनोद भामरे, अनिल अहिरे, सागर पवार, अनिल तोरवणे, जगन्नाथ पाटील, मधुकर देवरे, प्रकाश बच्छाव, पावबा बच्छाव आदी उपस्थित होते़ शिंदखेड्यात धरणे आंदोलनजुनी पेन्शन योजना पुन्हा तात्काळ लागू करावी या मागणीसाठी शिंदखेडा तालुक्यातील शिक्षण विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, महसूल विभाग, वीज वितरण कंपनी, पंचायत समीती, ग्रामसेवक संघटना या सह जिल्हा परिषद शाळा मधील शिक्षक, शासकीय निम शासकीय विविध विभागातील कर्मचारी संपामधे सहभागी झाले होते़ रंजीत राठोड यांच्यासह अन्य पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते़ प्रशासकीय कामकाजावर विपरीत परिणामशिक्षण विभागासह जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांनी लाक्षणिक संपात सहभाग घेतला होता़ शिक्षण विभागाला तर कुलूप ठोकण्यात आले होते़ परिणामी संपाच्या या काळात दैनंदिन प्रशासकीय कामकाजावर विपरीत परिणाम जाणवला़ कामकाजाचा खोळंबा झाला़ तसेच या काळात याकडे बघण्यासाठी कोणीही आले नसल्याने दिवसा दिवे सुरु होते़ या आहेत मागण्या १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या सर्व कर्मचाºयांना  जुनी पेंशन लागू करावी,  सर्व संवगार्तील वेतन त्रुटी दूर कराव्यात,  खाजगीकरण, कत्राटीकरण धोरण रद्द करून सर्व कंत्राटी कर्मचाºयांना  सेवेत कायम करावे, केंद्राप्रमाणे सर्व भत्ते मिळावेत (वाहतुक व शैक्षणिक भत्ता) ,  लिपीक व लेखा लिपीकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान पदनाम, समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करावे,  केंद्रा प्रमाणे महिला  कर्मचाºयांना प्रसुती, बालसंगोपन रजा व अन्य सवलती लागू कराव्यात,  पदोन्नती व सरळ सेवेने करण्यात येणारी नियुक्ती यामधील प्रारंभिक वेतनातील तफावत दूर करण्यात यावी,  राज्यातील सर्व चतुर्थश्रेणी कर्मचाºयांची होणारी वसुली तत्काळ थांबवून पदोन्नती शैक्षणिक पात्रता नुसार करावी, अनुकंप भरती तत्काळ व विनाअट करावी,  सर्व कर्मचाºयांची अर्जित रजा साठवण्याची कमाल मयार्दा काढण्यात  यावी आदी मागण्यांचा यात समावेश आहे.

टॅग्स :Dhuleधुळे