शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

ट्रकच्या धडकेत दोघ भावांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 21:46 IST

वाघाडी फाटा : संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्तारोको

सोनगीर : महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीवरील दोघांना दुचाकीसह फरफटत नेल्याची घटना वाघाडी फाटा येथे रविवारी दुपारी घडली़ घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी एकत्र येत गतिरोधकाच्या मागणीसाठी अर्धा ते पाऊण तास मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरला़ दरम्यान, या अपघातात अण्णा सुकदेव सोनवणे (४०) हे जागीच ठार झाले़ तर त्यांचा भाऊ देविदास सुकदेव सोनवणे (४३) यांचा रुग्णालयात उपचार घेताना सायंकाळी मृत्यू झाला़ दोन्ही साक्री तालुक्यातील भडगाव वधार्ने येथील रहिवाशी आहेत़. दरम्यान जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या अपघातात चारजण ठार झाले आहेत.अण्णा सोनवणे व देविदास सोनवणे हे दोघे भाऊ दुचाकीने शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथे दुचाकीने जात होते. त्याचवेळी शिरपूरहून धुळ्याकडेयेणाऱ्या ट्रकने (क्र. जीजे ०३ बीडब्ल्यू ९८८१) या क्रमांकाच्या दुचाकीला ( एमएच १५ सीए ३७५० ) जोरदार धडक दिली. यात अण्णा सोनवणे जागीच ठार झाले तर देविदास सोनवणे हे गंभीर जखमी झाले़ तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले़ उपचार सुरु असताना त्यांचा सायंकाळी मृत्यू झाला़. दरम्यान वाघाडी फाट्यावर गतिरोधक बसवावेत या मागणीसाठी ग्रामस्थांनी मुंबई-आग्रा महामार्गावर अधार्तास रास्तारोको आंदोलन केले. घटनास्थळी सोनगीर पोलिसांनी धाव घेत ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला़ वाघाडी फाट्यावर दोन दिवसात गतिरोधक बसविण्याचे काम केले जाईल असे आश्वासन सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी दिल्यावर आंदोलन थांबविण्यात आले़अपघात प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून ट्रक चालक संजय लालजी यादव (२७, रा़ मांडवा, जिल्हा जौनपुर, उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे़ त्याला पोलिसांनी अटक केली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे