शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बोराडी येथील स्टेट बँक शाखा दुसºयांदा फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 12:03 IST

शिरपूर : मुख्य दरवाजा तोडण्याच्या प्रयत्नात सायरन वाजला

ठळक मुद्देशिरपूर तालुक्यातील बोराडी येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतील घटना़ बँकेतील सायरन वाजल्यामुळे चोरटे तेथून पसार झाले़बँक फोडण्याचा दुसºयांदा अयशस्वी प्रयत्ऩ

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर :  तालुक्यातील बोराडी येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांकडून बॅँक फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. मुख्य दरवाजाचे कुलूप तोडण्याच्या प्रयत्नात बँकेतील सायरन वाजल्यामुळे चोरटे तेथून पसार झाले़ गेल्या आॅगस्ट महिन्यात सुध्दा अशाचप्रकारे ही बँक लुटण्याचा प्रयत्न झाला होता़ मात्र त्यावेळी चोरटे बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले होते. मात्र तरीही त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही़बोराडी-शिरपूर रस्त्यावरील बसस्थानकाजवळ स्टेट बँकेच्या शाखेत शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी बँकेच्याबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाची दिशा बदलून चॅनेल गेटचे कुलूप कटरने तोडले़ मात्र मुख्य दरवाजाचे कुलूप कटरने तोडताना बँकेत लावलेला धोक्याचा सायरन वाजल्यामुळे चोरटे घाबरले अन् सायरन स्पीकर तोडून बाजूला फेकून देत चोरटे पसार झाले. त्यांनी तोडलेले कुलूप जवळील गाईच्या गोठ्यात तर सायरनचा स्पीकर बाजूच्या ओट्यावर मिळून आला़बँकेचे फिल्ड आॅफिसर बोरसे हे शनिवारी सकाळी ९ वाजता बँकेत आले, तेव्हा त्यांना बँकेचे कुलूप तोडलेले दिसले़ त्यांनी लागलीच बँकेच्या वरिष्ठांना याबाबत कळविले़ घटनेची वार्ता बोराडी गावात समजताच अनेकांनी बॅँकेजवळ गर्दी केली़ घटनेची माहिती सांगवी पोलिसांना दिल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी तत्काळ भेट दिली़ त्यावेळी श्वान पथकाला पाचारण केले. मात्र पुराना दरवाजापर्यंत जावून श्वान घुटमळत राहिला. त्यामुळे चोरटे पुराना दरवाजापासून गाडीत निघून गेल्याचा अंदाज लावला जात आहे़ बोराडी येथील या बँकेतून काहीच चोरीस न गेल्याचे बँकेच्या अधिकारी व पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले़ बँकेत चोरी करण्याचा प्रयत्नाचा अज्ञात चोरांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे़  दुसºयांदा घडली घटनायापूर्वी, गेल्या १९ आॅगस्टच्या मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास ३-४ चोरट्यांनी बँकेच्याबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाची दिशा बदलून बँकेच्या बाहेर लावलेल्या सायरनची वायर कापून टाकल्यानंतर बँकेचे कुलूप तोडून प्रवेश मिळविला़ चोरट्यांच्या बँकेत प्रवेश करतांना बँकेच्या आतील कॅमेºयात ३-४ चोरटे घुटमळत असल्याचे कैद झाले आहे़ त्यानंतर एकाने सीसीटीव्ही कॅमेºयांचे कनेक्शन बंद केल्याचे कैद झाले आहे़ त्यानंतर चोरट्यांनी बँकेच्या कॅश रूममध्ये जावून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांच्याकडून तिजोरी न उघडल्याने ते रागाने कागदपत्रे अस्तावस्त फेकून निघून गेले होते.