शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गोमांससह गुरांचा ट्रक पोलिसांनी पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 22:10 IST

मोहाडी शिवारातील कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या पथकाने चाळीसगाव रोड आणि मोहाडी परिसरात कारवाई करुन गुरे आणि गोमांस वाहून नेणारा ट्रक असे दोन्ही कारवाई मिळून सुमारे ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला़ ही कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली़ मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग टोलनाक्याजवळ एमएच ०६ एबी ७८६१ या क्रमांकाचा ट्रक अडविण्यात आला़ ट्रकचालक शेख जमील हाजी अब्दुल रहिम (रा़ इस्लामपुरा, अन्सार चौक, मालेगाव), मुज्जमील इब्राहीम खान (रा़ कमालपुरा, मालेगाव) हे दोघे गो-मांस घेऊन जात असल्याचे पोलिसांच्या तपासणीतून समोर आले़ पोलिसांनी तपासणी केली असता ट्रकमध्ये मांसाचे लहान-मोठे तुकडे आढळून आले़  जप्त केलेला ट्रक आणि गोमांस एकूण १० लाख रुपये किंमतीचे आहे़ ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल राजपूत, प्रेमराज पाटील, जोएब पठाण, कबीर शेख यांनी केली़महामार्गावर दुसरी कारवाई-दुसरी कारवाई चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली़ चाळीसगाव चौफुलीवर एमएच ०४ सीयू ८१३७ आणि एमएच ०६ एजी ३९८६ या दोन्ही वाहनांच्या चालकांना वाहनांमधील ८ बैलांविषयी विचारणा केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली़ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले़ चंद्रकांत जनार्दन मोहिते (रा़ सत्यसाईबाबा नगर, साक्री रोड, धुळे) असे वाहन चालकाचे नाव आहे़  याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला़ ही कारवाई पोलीस निरीक्षक कुबेर चवरे, प्रल्हाद वाघ, मुक्तार मन्सुरी, योगेश चव्हाण, शंकर महाजन, संदिप कढरे, प्रेमराज पाटील, सुशील शेंडे या पथकाने केली़ 

टॅग्स :Dhuleधुळे