शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात ट्रकच्या कॅबिनमध्ये तरुणाचा गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 16:20 IST

चाळीसगाव रोड : शवविच्छेदनानंतर चित्र स्पष्ट

ठळक मुद्देट्रकच्या कॅबिनमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह शवविच्छेदन अहवालानंतर होणार चित्र स्पष्टचाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महामार्गालगत चाळीसगाव रोडवर एका ट्रकच्या कॅबिनमध्ये तरुणाचा गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळला़ ही घटना रविवारी सकाळी उजेडात आली़ शहरालगत असलेल्या चाळीसगाव रोडवरील चौफुलीजवळ हॉटेल कुणालच्यामागे काशिनाथ ट्रान्सपोर्ट आहे़ या ट्रान्सपोर्टच्या समोरील आवारात ट्रक टँकरची ट्रॉली दुरुस्ती करणाºया २२ वर्षीय प्रविण उर्फ बबलू उचाळे (रा़ मुंबई आग्रा महामार्गावरील गुरुद्वाराच्या मागे, उचाळे वस्ती) या युवकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे़ ही घटना शनिवारी रात्री घडली असून रविवारी सकाळी ही बाब लक्षात आली़ याबाबत मृताच्या नातेवाईकांनी या युवकाचा घातपात झाल्याचा आरोप केला आहे़ चौकशी करुन खुनाचा गुन्हा दाखल करावा अशीही मागणी केली आहे़ घटनास्थळी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले होते़ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे़ युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलेला आहे़ शवविच्छेदन झाल्यानंतर प्राथमिक अहवाल डॉक्टर सादर करतील़ त्यानंतरच गळफास घेवून आत्महत्या आहे की खून झाला आहे, हे स्पष्ट होईल़ असे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांनी सांगितले़ दरम्यान, या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे़