शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत सायकलस्वार गतप्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 18:36 IST

मोराणेनजिक घटना : वाहतुकही रोखली

ठळक मुद्देमोराणे गावाच्या पुलावर गुरुवारी दुपारी हा अपघात झाला़ट्रकच्या धडकेत मोराणे येथील सायकलस्वाराचा जागीच मृत्यूमहामार्गावर गतिरोधकाची मागणी करत वाहतूक रोखली़

आॅनलाईन न्यूज नेटवर्कधुळे : नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर धुळ्यानजिक मोराणे गावाजवळ ट्रकने उडविल्याने सायकलस्वाराचा जागीच मृत्यू ओढवल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली़ घटना घडताच नागरिकांनी गतीरोधकाची मागणी लावून धरली़ यासाठी काही वेळ रास्तारोको झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ धुळे शहरानजिक असलेल्या मोराणे गावाच्या पुलावर गुरुवारी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला़ मोराणे गावातील रहिवाशी राजेंद्र आनंदा सोनवणे (५२) हे सायकलने मोराणे फाट्याकडे येत असताना त्यांना ट्रकची जोरदार धडक बसली़ यात त्यांची सायकल दूरवर फेकली गेली़ यात सोनवणे हे रस्त्यावर आपटले गेले़ त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला़ रक्तबंबाळ झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू ओढवला़ अपघाताचे हे दृष्य पाहताच मोराणे गावातील ग्रामस्थ आणि महामार्गावर असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केलेली होती़ संतप्त जमावाने लागलीच रास्तारोको आंदोलन करत वाहतूक रोखली आणि महामार्गवर गतिरोधकाची मागणी लावून धरली होती़ यामुळे काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती़अपघाताचे वृत्त धुळे तालुका पोलिसांना कळताच मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले़ पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला़ त्यानंतर वाहतूक सुरळीत झाल्याने महामार्गावर निर्माण झालेली वाहतुकीची कोंडी मोकळी झाली़