शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

धुळ्यात महिलांनी मागितली व्यापाºयाकडे खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 18:25 IST

अश्लिल फोटो : चौघांविरुध्द गुन्ह्याची नोंद

ठळक मुद्देधुळ्यातील महिलांचा अजब प्रकारपोलिसांची तात्काळ कारवाई दोघा महिलांसह दोन साथीदारांवर गुन्हा टार्गेट करुन खंडणी मागणाºया टोळीचा फर्दाफाश

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील पाचकंदिल चौकातील शंकर मार्केटमधील दुकानात घुसून व्यापाºयासोबत दोघा महिलांनी जबरदस्तीने अर्धनग्न फोटो काढले़ बदनामी करण्याची धमकी देत दोन लाखांची खंडणी मागण्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला़ याप्रकरणी दोन महिलांसह चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला़ दरम्यान, त्या दोघा महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले़ पाचकंदिल चौकात जय शंकर मार्केटमधील दुकान नंबर १०२ चे मालक महेंद्र निरंजनदेव रेलन (६१) हे दुकानात असताना मनिषा रविंद्र माळी (रा़ सोमेश्वर विद्यानगर, सोनगीर) आणि अनिता उर्फ जयश्री प्रकाश पवार (रा़ गणेश कॉलनी, साक्री रोड, धुळे) या दोघी महिला दुकानात आल्या़ त्यांनी कपडे घेण्याचा बहाणा करुन व्यापारी रेलन यांना तळमजल्यात नेले़ त्यानंतर अगोदरपासूनच तेथे दबा धरुन बसलेले त्या महिलांचे साथीदार रोशन देविदास समनधिर (रा़ आंबेडकर नगर, नकाणे रोड, धुळे) आणि दादू (पूर्ण नाव माहित नाही) हे लागलीच दुकानात शिरले़ त्यांनी व्यापाºयाला पकडून अर्धनग्न करुन जबरदस्तीने महिलांसोबत फोटो काढून घेतले़ या चौघांनी वृध्द व्यापारी रेलन यांना शिवीगाळ करीत तुमचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो समाजात दाखवून तुमची बदनामी करु़ या बदल्यात आम्हाला दोन लाख रुपये द्या, अशी धमकी देत खंडणी मागितली़ हा प्रकार बुधवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडला़ या घटनेनंतर रेलन यांनी ही बाब पोलिसांनी कळविली़ लागलीच उपनिरीक्षक नाना आखाडे, विनोद आटोळे, मिलींद सोनवणे, हिरालाल बैरागी, महिला हवालदार कुंवर यांनी घटनास्थळ गाठले़ मनिषा आणि अनिता या दोघींना ताब्यात घेतले़ मात्र त्यांचे साथीदार तेथून पळून जाण्यास यशस्वी ठरले़ याप्रकरणी महेंद्र रेलन यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार संशयित या चौघांविरुध्द बुधवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास भादंवि कलम ३८४, ५४१, ३२३, ५०४, ५०६, ४२७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद आटोळे पुढील तपास करीत आहेत़ व्यापारी व अधिकारी यांना टार्गेट करुन त्यांच्याकडून खंडणी मागणाºया टोळीचा फर्दाफाश झाला आहे़