शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

उन्हाच्या तडाख्यातही आदिवासींचा उत्साह कायम

By admin | Updated: March 13, 2017 01:11 IST

भोंग:या उत्सवाचा समारोप : रोहिणी येथे रंगला भोंग:या; पाच लाखांहून अधिक उलाढाल; नवागाव येथे मेलादा उत्सव

शिरपूर : उन्हाच्या  तडाख्यातही  शिरपूर तालुक्यातील रोहिणी येथे रविवारी आयोजित भोंग:या उत्सवात आदिवासी बांधवांमध्ये उत्साह दिसून आला. धूलिवंदनाच्या पूर्वसंध्येला रंगलेल्या या उत्सवात सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी बांधवांची प्रचंड गर्दी झाली होती. सायंकाळी उशिरार्पयत चाललेल्या या उत्सवात पाच लाख रुपयांहून अधिक आर्थिक उलाढाल झाली. दरम्यान, शिरपूर तालुक्यात आयोजित भोंग:या उत्सवाचा समारोप झाला असून नवागाव येथे शनिवारपासून मेलादा उत्सवाला सुरुवात झाली आहे.  रविवारी रोहिणी गावाचा आठवडा बाजाराचा दिवस होता. त्यामुळे  12 रोजी भोंग:या बाजार भरला. उत्सवप्रिय आदिवासी युवक-युवतींसाठी हा बाजार म्हणजे आनंद द्विगुणित करून व्यक्त करण्याचे मोठे ठिकाण आहे. तरुणांमधील सळसळता उत्साह आणि आदिवासी संस्कृतीचे आगळेवेगळे दर्शन घडविणा:या येथील भोंग:या बाजारात यंदा परिसरातील हजारो आदिवासी बांधवांनी हजेरी लावली होती. पांरपरिक कार्यक्रम सादर करीत जल्लोषात भोंग:या बाजाराची सांगता झाली.रोहिणीत मिरवणूक रविवारी रोहिणी गावात आयोजित भोंग:या उत्सवात आदिवासी तरुण-तरुणींनी सहभाग घेतला. या वेळी  त्यांनी केलेल्या चित्तवेधक वेशभूषेने सर्वाचे लक्ष वेधून घेतले.  यावेळी नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. हीना गावीत, भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे, आमदार डॉ. विजयकुमार गावीत उपस्थित होते. होळी, धूलिवंदनाचा उत्साह आदिवासी समाजात होळी या सणाला विशेष महत्त्व आहे. रविवारी होळी सण असल्यामुळे आदिवासी बांधवांचा सकाळपासूनच उत्साह दिसून येत होता. तसेच सोमवारी धूलिवंदन असल्यामुळे आदिवासी बांधवांनी उत्सवात सहभागी झालेल्या बांधवांना रंग लावून या उत्सवाचा शोभा आणखीनच वाढविली. या वेळी काही आदिवासींनी त्यांच्यातील पारंपरिक कलाविष्कार सादर करत सर्वानाच थक्क करून सोडले. होळीनंतर फाग उत्सव सुरू होणार होळीनंतर फाग गोळा करण्यासाठी पावरा जमातीतील पुरुष गावात फिरतात़ यातून जमा झालेल्या रकमेतून बोकड विकत घेऊन त्यांचे मांस फागसाठी वर्गणी दिलेल्या लोकांकडे घरोघरी दिले जाण्याची प्रथा आजही टिकून आह़े गावातील बांधव एकत्रितरित्या हा कार्यक्रम साजरा करतात़ यास गुट असेही म्हणतात़ आदिवासी बांधव तब्बल या 15 दिवसात भोंग:या, होळी, मेलादा व फाग असे उत्सव साजरे करतात़शिमगा ङोलण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी 4शिरपूर तालुक्यातील नवागाव येथे शनिवारी होळी पेटविण्यात आली. त्यानंतर रविवारी पहाटे होळीचा शिमगा ङोलण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी झाली होती. शिमगा ङोलल्यानंतर होळीला प्रदक्षिणा घालून हा सण उत्साहात साजरा केला. तर ज्यांनी विस्तवावर चालण्याचा नवस केला होता. त्यांनी तो नवस फेडला. या वेळी  येथील तरुणांनी गे:या, रिसडा, निचक्याची वेशभूषा करून नृत्य सादर केले. भोंग:या उत्सवाचा थाटात समारोप 4रविवारी शिरपूर तालुक्यातील रोहिणीसह, सेंधवा, पानसेमल, बडवानी, चेरवी, पोखल्या, इंद्रपूर येथे भोंग:या उत्सवाचा समारोप झाला.