शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल अ‍ॅपद्वारे होणार कल चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 17:11 IST

उत्सुकता  : विद्यार्थ्यांची आवड कोणत्या क्षेत्रात आहे, याची माहिती मिळू शकणार

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : इयत्ता  दहावीसाठी घेण्यात येणारी कलमापन चाचणी आता मोबाईल अ‍ॅपद्वारे घेण्याचा निर्णय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे.या संदर्भात शिक्षकांना नुकतेच जो.रा.सिटी हायस्कुलमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. दहावीनंतर कुठले क्षेत्र निवडायचे,  याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो. त्यासाठी ही कल चाचणी अत्यंत महत्वाची असते. या कलमापन चाचणीमुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळण्यास तसेच त्यांची आवड कोणत्या क्षेत्रात आहे, हे कळण्यास मदत होत असते. शिक्षण विभाग, विद्या प्राधिकरण, आणि श्यामची आई फाऊंडेशन या तिघांनी मिळून हा उपक्रम सुरू केलेला आहे. या संदर्भात  काही शिक्षकांचे नुकतेच जो.रा. सिटी हायस्कूलमध्ये प्रशिक्षण झाले आहे. त्यांना मोबाईल अ‍ॅपद्वारे कलचाचणी व अभिक्षमता चाचणी कशा प्रकारे घेण्यात यावी, या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील विस्तार अधिकारी रंजीता ढिवरे यांनी सांगितले. जिल्ह्यातील  सर्व शाळांमध्ये १८ डिसेंबर १८ ते १७ जानेवारी १९ या कालावधीत दहावीतील  विद्यार्थ्यांची कलचाचणी व अधिक्षमता चाचणी घेण्यात येणार आहे.  दरम्यान शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे.पहिल्यांदाच राबविण्यात येत आहे प्रयोग यापूर्वी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी, अधिक्षमता चाचणी कॉम्युटरद्वारे घेण्यात येत होती. मात्र अनेक शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात संगणक उपलब्ध नसणे, ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा नसणे आदी तांत्रिक कारणामुळे ही चाचणी घेण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत होत्या.  यावर पर्याय म्हणून मोबाईल अ‍ॅपद्वारे कलचाचणी, अधिक्षमता चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात येत असलचे सांगण्यात आले. याचा विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे