कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून ट्रॅव्हल्स बंद होत्या. काेरोनाची दुसरी लाट आता ओसरली असल्याने खासगी प्रवासी वाहतूक सेवा पुन्हा सुरू झाली आहे. मागील दोन महिन्यांपासून ट्रॅव्हल्स सुरू झाल्या आहेत. मात्र प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता; त्यामुळे चालक व मालक यांच्यामध्ये नाराजी होती; पण गणेशोत्सवात प्रवाशांची गर्दी वाढल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच काही प्रमाणात भाववाढदेखील झाली आहे. इंदोरसाठी ५५०, सुरत ५००, अहमदाबाद ६०० तर कोल्हापूरसाठी १२०० रुपये मोजावे लागत आहेत.
प्रवाशांना फटका
गणेशोत्सवासाठी पुणे येथे जात आहे. आतापर्यंत तिकिटाचे दर बरेच कमी होते. मात्र बुकिंग करण्यासाठी गेलो असता तिकिटाचे दर वाढल्याची माहिती मिळाली.
गौरव भामरे, प्रवासी
डिझेलचे दर वाढल्याने तिकिटांचे दर वाढल्याची माहिती दिली जात आहे. ज्यावेळी गणेशोत्सव किंवा दिवाळी, दसरा असे सण येतात, त्यावेळी भाववाढ करणे चुकीचे आहे.
- प्रसाद लोहार, प्रवासी
दोन वर्षांनंतर बरे दिवस
काेरोनामुळे ट्रॅव्हल्स बंद होत्या; त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. मागील दोन महिन्यांपासून त्या पुन्हा सुरू झाल्या आहेत; पण प्रवाशांची संख्या कमी होती. आता गणेशोत्सवामुळे प्रवासी वाढले आहेत; त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
महेंद्र पाटील
कोरोनामुळे ट्रॅव्हल्सचालकांवर मोठे संकट कोसळले होते. गेली दोन वर्षे ट्रॅव्हल्स बंद असल्याने आमच्यावर बेरोजगारीची वेळ आली होती. आता पुन्हा कामावर परतलो असून प्रवाशांची संख्या वाढली आहे.
- बाळू पाटील
या मार्गावर सर्वाधिक ट्रॅव्हल्स धावतात
धुळे - पुणे
धुळे - सुरत
धुळे - अहमदाबाद
धुळे - इंदूर
भाडे वाढले
धुळे - पुणे
आधीचे ६००
आताचे ६५०
धुळे - सुरत
आधीचे ४००
आताचे ५००
धुळे - अहमदाबाद
आधीचे ५५०
आताचे ६००
धुळे - इंदूर
आधीचे ५००
आताचे ५५०
धुळे - कोल्हापूर
आधीचे - ११००
आताचे १२००