शिंदखेडा रेल्वे स्थानकावरून दिवसभरात पाच ते सहा रेल्वे गाड्या प्रवासी वाहतूक करतात. त्यातील लांब पल्याच्या सुरत भुसावल, अहमदाबाद गोरखपुर, सुरत अहमदाबाद अशा रेल्वे गाड्याच समावेश आहे. त्यातील आरक्षण केलेल्या प्रवाशांना रेल्वे डब्यातच सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी रेल्वे विभागाकडून टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या क्रमांकावर काॅल करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे कॅटीग विभागाकडे उपलब्ध असलेले व्हेज, नाॅन व्हेजसह अन्य मेन्यू विचारण्यात येतात. ती ऑडर देण्याऱ्या प्रवाशाला पुढील स्टेशन येई पर्यत जेवण उपलब्ध करून देण्यात येते. ही सुविधा ऑनलाईन असल्याने ऑडर करणारा ग्राहक कोणत्या वेळेत, काेणत्या रेल्वे स्टेशनपर्यत पोहचले असा अंदाज लावला जातो. त्यानुसार त्या ग्राहकाला कॅटीग वेटरच्या माध्यमातून आरक्षित डब्यातच आवडीनुसार जेवण उपलब्ध करून दिले जाते.
शाहकारी व मासाहारी जेवणाची सुविधा....
रेल्वेच्या सुविधेत अडचणी निर्माण होऊ नये. यासाठी आहार, आरोग्य, सुरक्षा, सुरक्षिता पुरविली जाते. त्यासाठी उत्तम हेज नाॅन व्हेज सुविधा पुरविणाऱ्या खाजगी कॅटीगला रेल्वे विभागाकडून निविदा दिली जाते. सुरत भुसावल मार्गावरील दोंडाईचा, शिंदखेडा, नरडाणा लहान रेल्वे स्टेशन असल्याने येथील कॅटीगवर चहा, नास्टाची सुविधा मिळते. मात्र प्रवाशांना गैरसोय होऊ नये, यासाठी हॅज नाॅन व्हेज ऑडर देणाऱ्या प्रवाशांना नंदूरबार, जळगाव, भुसावल अशा मोठ्या रेल्वे कॅटीगव्दारे सर्व सुविधा पुरविल्या जातात.
वेटर देतात सुविधा
रेल्वेत प्रवाशांना जेवणासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला जातो. त्यासाठी आयआरसीटी संस्थेच्या कंटींग माध्यमातून वेटर रेल्वे डब्यात जावून ऑडर केलेल्या प्रवाशापर्यत जेवण व अन्य खाद्य पदार्थ उपलब्ध करून दितो.