शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पारंपरिक नृत्याविष्काराने आणली रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 15:41 IST

उत्सव चैतन्याचा : चित्तवेधक वेशभूषेने वेधले भाविकांचे लक्ष; सुप्त कलागुणांचे उत्कृट सादरीकरण

ठळक मुद्देअधिका-यांनीही धरला ठेका; उत्कृष्ट नृत्य सादर ९५ जणांचा पारितोषिक देऊन सन्मानजिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस मैदानावर नवरात्रोत्सवानिमित्ताने गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन, पोलीस अधीक्षक एम. रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, पोलीस उपअधीक्षक हिंमत जाधव, रवींद्र सोनवणे यांनीही सहभाग नोंदवत गरबा यावेळी उत्कृष्ट गरबा नृत्य सादर करणाºया ९५ जणांना पारितोषिक देऊन सन्मानित केले. याप्रसंगी प्रशिक्षक सिद्धार्थ बलिया, गौतम शुक्ला, सपना पाटणी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : नवरात्रोत्सवानिमित्ताने शहरातील विविध भागात गरबा-दांडिया नृत्यात तरुणाई बेधूंद झाली आहे. विविध गाण्यांवर किंवा पारंपारिक वाद्याच्या निनादात तरुणांसह अबालवृद्धही ठेका धरत असून त्यांच्यातील सुप्त कलागुणांचा उत्कृष्ट कलाविष्काराचे सादरीकरण ठिकठिकाणी होत असल्यामुळे नवरात्रोत्सवात उत्साहाचे वातावरण दिसत आहे. विविध गाण्यांवर धरला तालतरुण, तरुणी गुजराती, मराठी आणि हिंदी गीतांवर  गरबा, दांडिया नृत्य सादर करत आहेत. ‘रंगीलो म्हारो़ ढोलना’, ‘पंखिडा रे’, ‘आम्ही काका मामा ना पोर’ व इतर अहिराणी भाषेतील गीतांना अधिक पसंती मिळत आहे़चित्तवेधक वेशभूषागरबा व दांडिया नृत्याविष्कार सादर करणारे महिला व तरुणी चित्तवेधक वेशभूषा परिधान करून नृत्य सादर करण्यासाठी  ठेका धरत आहेत. पुरुष व तरुणांनी पठाणी, चुडीदार, शेरवाणी, पगडी, जीन्स आदी पेहराव करण्यावर भर देत आहेत.  शहरातील नित्यानंद नगर आणि अग्रवाल नगरात, जयहिंद कॉलनी, देवपूर परिसर, चित्तोड रोड, कुमारनगर आदी विविध भागांमध्ये नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याठिकाणी गरबा व दांडिया खेळण्यासाठी तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. रात्री ८ वाजेपासून दांडिया सुरु शहरात दररोज रात्री आठ वाजेपासून तरुणाई, महिला व पुरुष  गरबा व दांडिया नृत्य खेळण्यासाठी दाखल होत आहेत. नियमानुसार रात्री दहा वाजेपर्यंत गरबा खेळण्याची संधी मिळत असल्यामुळे गरबा नृत्य रंगात आलेले असताना तो थांबवावा लागत आहे. परिणामी, अनेकांचा हिरमोड होत आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार अष्टमी व नवमीच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत गरबा नृत्य खेळण्यासाठी सूट देण्यात आली आहे. यानिमित्ताने शहरातील  विविध मंडळांतर्फे सामाजिक उपक्रमांवर विशेष भर दिला जात आहे.  कार्यक्रमाची रेलचेल गरबा मंडळातर्फे रात्री गरबा आणि रास दांडिया खेळला जात आहे. त्याचबरोबर इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. सर्वच ठिकाणी गरबा-दांडियासाठी गर्दीचा ओघ वाढलेला दिसत आहे.