शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

धुळ्यातील यात्रेत बुद्धीला चालना देणा-या खेळण्यांना पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 20:44 IST

यात्रोत्सव : मंदिर परिसरात स्वच्छतेकडे मनपाचे दुर्लक्ष; हरि ओम मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतला पुढाकार

ठळक मुद्देयात्रेत पेला, लहान ताटल्या, अगरबत्तीचे घर, मग, केर फेकण्याची सुपली, पायपुसण्या या फक्त दहा रुपयात उपलब्ध होत आहे.त्यामुळे यात्रोत्सवात तीन ते चार ठिकाणी बसलेल्या विक्रेत्यांच्या ‘हर एक माल’च्या स्टॉलवर भाविकांची प्रचंड गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. काही विक्रेत्यांच्या ‘हर एक माल’ च्या दुकानावरील वस्तूंच्या किमंती १०० रुपयांच्या पुढे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  : खान्देश कुलस्वामिनी आई एकवीरादेवी यात्रोत्सवात दुकानदारांनी विक्रीसाठी ठेवलेल्या चायना मेड खेळण्यांची भुरळ शहरातील लहान मुलांना घातली आहे.  तसेच बुद्धीला चालना देणाºया बुद्धिबळ, डिजीटल बाराखडी, इंग्रजी अक्षरे ओळखा या खेळण्यांनादेखील भाविकांकडून विशेष मागणी मिळत आहे. यात्रोत्सवात जीवनपयोगी वस्तू, खेळण्या खरेदीसाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. दरम्यान, शुक्र वारी सकाळी हरि ओम मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंदिर व परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. एकवीरा देवी यात्रोत्सवात लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे सकाळी व दुपारच्यावेळी भाविक यात्रोत्सवात दिसत नसले, तरी सायंकाळी सहा वाजेनंतर भाविकांची गर्दी वाढण्यास सुरुवात होत आहे. यात्रेत दाखल झालेल्या विक्रेत्यांकडे मुलांच्या बुद्धीला चालना मिळेल, अशा खेळण्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याची माहिती सुरेश चौधरी  या विक्रेत्याने दिली.   तर आता मुलांच्या परीक्षा आटोपल्यामुळे सुट्टीत करमणुकीसाठी पालक त्यांच्या पाल्यांसाठी कॅरम, क्रिकेटचे साहित्य खरेदीकडेही विशेष भर देताना दिसत आहेत.  चायना मेड खेळण्यांमध्ये नानाविध प्रकार यात्रोत्सवात उपलब्ध आहेत. अगदी ५० ते थेट १ हजार रुपयांपर्यंतच्या खेळणी विक्रेत्यांच्या स्टॉलवर उपलब्ध आहे.  रात्री उशिरापर्यंत यात्रा सुरू ठेवावी यात्रोत्सव सुरू होऊन पाच दिवसांचा कालावधी झाला आहे. त्यात उन्हाची दाहकता वाढल्यामुळे भाविक सायंकाळनंतरच घराबाहेर पडतात. त्यात रात्री  अकरा वाजेनंतर पोलीस यात्रेतील दुकाने दुकाने बंद करण्याचे सांगतात. परिणामी, विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होतो आहे.   त्यामुळे यात्रा रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवावी, अशी मागणी विक्रेत्यांकडून होत आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे