शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

टॉवर उद्यानाचे सुशोभिकरण प्रगतीपथावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:27 IST

महापालिका : वर्षभराअखेर उद्यानाचे काम पूर्ण करण्याचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील ऐतिहासिक टॉवर उद्यानाचे सुशोभिकरण काम महापालिका प्रशासनाकडून केले जात आहे़  टॉवर उद्यानासाठी ३ कोटी ९८ लाख ५४ हजार २४ रुपायांचा  निधी मिळाला आहे़ सध्या या उद्यानाचे काम प्रगतीपथावर आहे़शहरातील बारापत्थर रस्त्यावर असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल उद्यान या तब्बल १४७ वर्षे जुन्या ऐतिहासिक उद्यानाचा लवकरच कायापालट केला जाणार आहे. १४७ वर्षे जुन्या असलेल्या ब्रिटीशकालिन उद्यानात ५६़५ फूट उंच टॉवर असून त्यामुळे हे उद्यान ‘टॉवर गार्डन’ म्हणून प्रसिध्द आहे़स्वातंत्र्योत्तर काळात या उद्यानाचे नामकरण सरदार वल्लभभाई पटेल असे करण्यात आले. या उद्यानाच्या आवारात अहिल्याबाई होळकर यांचे स्मारकही आहे़ परंतु गेल्या ३० ते ४० वर्षात तत्कालीन नगरपालिका व विद्यमान महापालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे या उद्यानाची अवस्था बकाल झाली होती. त्याठिकाणी असलेली खेळणी, कारंजे, लहान मुलांसाठी असलेली रेल्वे यांची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांनीही त्याकडे पाठ फिरवली होती. या उद्यानांमध्ये लहान मुलांना घेवून जाणेही पालक उत्सूक  नसत. तुटलेल्या खेळण्यामुळे दुखापतीचीही शक्यता नाकारता येत नव्हती.  शासनाकडून उद्यानासाठी ४ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता़ वर्षभरानंतर या उद्यानाचे काम पुर्णत्वास येणार आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे