शिरपूर तालुक्यातील टेंभेपाडा, खारीखानपाडा, नवापाडा, गोचड्यापाडा, नवागाव, आपसिंगपाडा, सरदारपाडा, रूपसिंगपाडा, चोबल्यापाडा, मांजनीपाडा, कुंभीपाडा, ठाणसिंगपाडा, विधन्यापाडा, सकऱ्यापाडा, चांदयापाडा, गुव्हाळपाडा, शेरसिंगपाडा, बोरपाणी, मालपुरपाडा, अमरपाडा, चाकडू, वाकपाडा, सजगारपाडा, तिखिबर्डी, मांजरबर्डी, तेल्यामहू, वाहण्यापाणी, टाक्यापाणी, नवादेवी, साखळीपाडा, सामरादेवी, कंज्यापाणी, अंबाडुक, रामपुरा, वडपुरा,धरमपुरा, रोषमाळ, वरचा रोषमाळ,धनपाणी,विकल्यापाडा,मीठगाव,नवा धाबापाडा,जुना धाबापाडा,सलईपाडा,नंदनगर,पिंप्रीपाडा,इ.पाड्यावर कोरोनाचा फैलाव झाला नाही. ही एक आदिवासी बहुल भागासाठी उत्सुकतेची बाब आहे. तसेच गावचे सरपंच,तलाठी, ग्रामसेविका आणि गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायतींच्या माध्यमातून संपूर्ण गावांमध्ये सॅनिटायझरची फवारणी करणे. तसेच ग्रामस्थांची एकजूट आणि निर्णय क्षमता असल्यामुळं कोरोनासारखी महाभयंकर साथ या पाड्यामध्ये प्रवेश करू शकली नाही. वरीलप्रमाणे प्रत्येक गाव व पाड्याप्रमाणे आणि शहरांनी सतर्कता बाळगत फिजिकल डिस्टन्सिंग, घरा-घरामध्ये सॅनिटायझरचा वापर यासारख्या छोट्या छोट्या ो नियमित पालन केले तर संपूर्ण महाराष्ट्र कोरोनामुक्त व्हायला वेळ लागणार नाही, असं येथील ग्रामस्थ सांगतात आहेत.
या पाड्यावर फैलाव या कारणामुळे होऊ शकला नाही त्यात प्रमुख कारण म्हणजे या पाड्यांची विरळ वस्ती. वरील सर्व पाड्यांवरील नागरिक हे बहुतांश डोंगर व उंच भागात असल्यामुळे त्यांचा एकमेकांशी संपर्क कमी प्रमाणात होतो तसेच आजारी जरी असले ते आपोआपच विलगीकरणात समाविष्ट होतात येथील नागरिक नैसर्गिकपणे क्वारंटाईन राहतात, त्यामुळे या भागात कोरोनाचा शिरकाव नसल्याबाबतचे मत बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.नीलिमा देशमुख व्यक्त केले.