शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

गळफास घेऊन तिघांची आत्महत्या, धुळे जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या घटना

By देवेंद्र पाठक | Updated: September 14, 2023 16:39 IST

पोलिसात गुन्हा दाखल

देवेंद्र पाठक, धुळे : तालुक्यातील कापडणे, शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा आणि साक्री तालुक्यातील बोपखेल येथे झालेल्या तीन वेगवेगळ्या घटनेत तीन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या. याप्रकरणी पोलिसात ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येमागील कारण मात्र समजू शकलेले नाही.

कापडणे गावातील घटना

धुळे तालुक्यातील कापडणे येथील राहुल अशाेक पाटील (वय ३०) या तरुणाने त्याच्या राहत्या घरातील छताच्या लाकडी कड्याला सुती दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. घटना लक्षात येताच त्याला लोकांच्या मदतीने खाली उतरवून सोनगीर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. सोनगीर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सहायक पोलिस उपनिरीक्षक महेंद्र वानखेडे घटनेचा तपास करत आहेत.

वालखेडा येथील घटना

शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथे राहणारा नितीन संभाजी पाटील (वय ३५, मूळ रहिवासी बुधगाव, ता. चोपडा) या तरुणाने वालखेडा गावातील बसस्टँडजवळ कंचनपूर रोडवरील राहत्या घरात पंख्याला बेडशीटच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. त्याला नरडाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. नरडाणा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सहायक पोलिस उपनिरीक्षक गोटीराम पावरा घटनेचा तपास करीत आहेत.

बोपखेल येथील घटना

साक्री तालुक्यातील बोपखेल येथील दिलीप रामदास अहिरराव (वय ६०) या वृध्दाने सुती दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. घटना लक्षात येताच त्यांना पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. पोलिस हेड कॉन्स्टेबल पी. यू. सोनवणे घटनेचा तपास करत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे