शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
3
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
4
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
5
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
6
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
7
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
8
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
9
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
10
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
11
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
12
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
13
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
14
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
16
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा पूजाविधी
17
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
20
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल

ट्रक उलटून लोखंडी पाईपखाली दबल्याने तीन जण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 22:29 IST

दहिवेलनजिकची घटना : महामार्गावर कोंडी

ठळक मुद्देदहिवेल गावापासून जवळच असलेल्या डुकरझिरे गावाजवळ महामार्गावर ट्रक उलटला़ ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात ३ जण ठार तर एक जण जखमी झाला़पाऊस आणि रस्त्यावर पडलेल्या लोखंडी पाईपामुळे वाहतुकीची कोंडी़

लोकमत न्यूज नेटवर्कदहिवेल : दहिवेल गावापासून जवळच असलेल्या डुकरझिरे गावाजवळ महामार्गावर   ट्रक उलटला झाल्याने त्यातील लोखंडी पाईपाखाली दाबले जाऊन तीन जणांचा जागीच करुण अंत झाला. तर एक जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री साडे सात वाजेच्यासुमारास घडली़ या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती़ दरम्यान, त्याचवेळेस पाऊस येत असल्यामुळे मदत कार्याला अडथळा येत होता़   पाण्याची पाईप लाईन टाकण्यासाठी वापरले जाणारे लोखंडी पाईप घेऊन  जीजे १२ बीव्ही ६१८३ क्रमांकाचा १२ चाकी ट्राला  दहिवेलकडून धुळ्याकडे जात होता़ तो महामार्गावर डुकरझिरे गावाजवळ अचानक उलटला. ट्रालावरील लोखंडी पाईप खाली पडले. त्याखाली दाबले जाऊन  ट्रालाच्या बाजुने चालणारे अर्जुन अशोक सोनवणे (१८), विनोद भाईमल मालते (३०), उगलाल रामलाल गायकवाड (३५) सर्व रा. मालणगाव या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दादाजी विश्वास भील रा. मालणगाव हे जबर जखमी झाले आहेत़ ट्रालाखाली एम.एच.१००४ क्रमांकाची दुचाकी सुध्दा आढळून आली आहे़ या चार जणांपैकी दोन जण या मोटारसायकलवर जात असतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.जेसीबीची मदतघटनेचा आवाज येताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली होती़ पाईपखाली दबल्या गेलेल्यांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली होती़ जेसीबी आल्यानंतर मदत कामाला वेग आला होता़ महामार्गावर कोंडीरात्रीच्या वेळी झालेल्या या अपघातामुळे रस्त्यावर इतरत्र पाईप पडले़ दुचाकीही दाबली गेली होती़ रस्त्यावर आलेले पाईप आणि पलटी झालेला ट्रक यामुळे महामार्गावर कोंडी झाली होती़ पावसामुळे मदत कार्याला अडथळा येत होता़