शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधिशांच्या घरावर दगडफेक व जाळपोळप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:25 IST

एक ताब्यात, दोघांचा शोध सुरुच

दोंडाईचा : येथील दिवाणी न्यायाधीश व तत्कालीन न्यायाधीश यांच्या घरावर दगडफेक व न्यायाधीशांची कार समजून वाहन जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन संशयितांविरोधात दोंडाईचा पोलिसात जाळपोळ, दगडफेक, शिवीगाळ व नुकसानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे दोंडाईच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दोंडाईचा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शासकीय निवासस्थानात न्या.आण्णासाहेब गिºहे वास्तव्यास आहेत. सोमवारी संध्याकाळी दोंडाईचा पोलिसात काही गुन्हे दाखल असलेल्या तीन जणांनी न्या.गिºहे यांची कार समजून एम.एच. १५ बी. ई.बी. ४९२३ क्रमांकाच्या वाहनाला जाळण्याचा प्रयत्न केला.तसेच घरावर दगडफेक करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतू ती कार चंद्रसिंग नारायणसिंग राजपूत यांची होती. त्यांनी सावलीसाठी झाडाच्या आडोशाखाली ही कार उभी केलेली होती. मात्र, जळत असलेली कार न्यायाधिशांची नसून दुसऱ्याची असल्याचे लक्षात आल्यावर हल्लेखोरांनी तत्कालीन न्यायाधिश संतोष गरड यांचे निवासस्थानाकडे मोर्चा वळविला. जनता कॉलनीतील भाडेतत्वावर घेतलेल्या घरात हे न्यायाधिश वास्तव्यास असून सध्या धुळे येथे कार्यरत आहेत. मुलाचे शिक्षण सुरु असल्याने ते येथून ये- जा करतात. हल्लेखोरांकडून त्यांच्या घरावरही हल्ला करण्यात आला. तसेच घरावर दगडफेक करण्यात आली. त्यात खिडक्याची काचे फुटली. वॉल कंपाऊंडचे नुकसान करण्यात आले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, हल्लेखोरांचा प्रतिकार करण्यासाठी काहींनी हल्लेखोरांना मारहाण केली. त्यात दोन हल्लेखोर फरार झाले. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन संशयित विक्की उर्फ विवेक अजय निकवाडे यास ताब्यात घेतले आहे. मारुती कार जाळण्याचा प्रयत्न व दगडफेक केल्याप्रकरणी कार मालक चंद्रसिंग नारायणसिंग राजपूत यांच्या फिर्यादीनुसार विक्की निकवाडे, यशोदिप गीते, बॉबी यांच्याविरुद्ध दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, दोन्ही न्यायाधीश अन्य गुन्हा दाखल करणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.विक्की निकवाडे पोलिसांच्या ताब्यात असून अन्य दोन फरार आहेत. फरार संशयितांना ताब्यात घेण्यास पोलिसांना अजून यश आलेले नाही. दरम्यान, अनुचित प्रकार घडू नये म्हणून न्या.अण्णासाहेब गिºहे यांच्या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे