शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

तिघा नराधमांना अटक; एक अद्याप फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 11:23 IST

विधवा महिलेवर अत्याचार : पत्रपरिषदेत पोलीस अधिकायांनी दिली माहिती 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथे शेतात राखणदार म्हणून काम करणाºया विधवा महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी चार आरोपी निष्पन्न झाले असून तिघा नराधमांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. विधवा महिलेवर अत्याचाराची ही घटना १५ जून रोजी मध्यरात्रीनंतर घडली होती. ही महिला शेतात झोपडीबाहेर खाटेवर झोपली असताना तिला चार अनोळखी व्यक्तींनी उचलून शेतात नेले व तेथे तिच्यावर सामूहिकरीत्या अत्याचार केले होते. त्या महिलेच्या तक्रारीवरून शिरपूर शहर पोलिसांत सामूहिक अत्याचाराच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. तक्रारदार महिलेने सांगितलेल्या वर्णनानुसार पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच तपास अधिकारी संदीप गावीत, शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बुधवंत व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी तपासासाठी पथके तयार केली. पथकांनी परिसर पिंजला या पथकांनी शिरपूर तालुक्यातील टेकवाडेसह अर्थे, विखरण, वाघाडी, भरवाडे, टेंभे, तºहाडी, खामखेडा व परिसरातील गावे, ढाबे, हॉटेल यांची तपासणी केली. तसेच शेतांमध्ये व ट्रॅक्टरवर काम करणारे मजूर, पेट्रोलपंप, हॉटेल, पानटपºया अशा ठिकठिकाणी जाऊन वर्णनानुसार शोध घेतला. संशयित गवसला; गुन्ह्याची कबुलीरेकॉर्डवरील संशयितांची तसेच दारूचे व्यसन, गुटखा खाणाºया व्यक्तींची पडताळणी केली असता राजेश बदु भिल (३५) हा संशयित मिळाला. त्यास विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन गोरख भाईदास भिल (३३), शरद गंगाराम भिल (३२) व रवींद्र उर्फ बांगा रामचंद्र भिल सर्व रा.भरवाडे, ता.शिरपूर या साथीदारांची नावे सांगितली. यातील रवींद्र भिल हा फरार असून उर्वरीत तिघांना अटक करण्यात आली आहे. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप सावंत, पोलीस निरीक्षक बुधवंत उपस्थित होते. 

 

टॅग्स :Dhuleधुळे